एक्स्प्लोर

राम कदमांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी, कदम म्हणाले, कुठलीही टेस्ट करा

कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर तिच्याविरोधात टिकेची झोड उठली आहे. याप्रकरणी तिची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. अशातच कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राम कदम यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसने विवेक मोईत्राचीही आठवण करून दिली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तसेच सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. तसेच कंगनाला भाजपच्या आयटीसेलची साथ आहे. हे मिळून भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांचे ट्वीट :

सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये कंगना आणि राम कदम टॅग करत म्हटलं आहे की, '@KanganaTeam म्हणजे "कंगना+भाजप IT सेल" कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने @ramkadam यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे.'

सचिन सावंत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अशी मागणी केली आहे. 'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavisआणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे.' , असं सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. विवेक मोईत्रा यांचा याआधी ड्रग्जसंदर्भात उल्लेख आला होता. परंतु, ती गोष्ट राहुल महाजन यांच्या संदर्भात होती. राहुल महाजन आणि राम कदम हे मित्र होते. त्यामुळे या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचा उल्लेख केला असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ट्वीट करताना सचिन सावंत म्हणाले की, 'विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.'

या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे : राम कदम 

सचिन सावंत यांच्या ट्वीटला उत्तर देत राम कदम यांनी ट्वीट केलं आहे. राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले की, 'छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा.'

ड्रग्ज कनेक्शन आणि बॉलिवूडसंदर्भात राम कदम यांना अधिक माहिती : सचिन सावंत

'ड्रग्ज कनेक्शनसंबंधी राम कदम एवढं बोलत आहे. खऱ्या अर्थाने ड्रग्ज कनेक्शन आणि बॉलिवूडसंदर्भात अधिक माहिती असणारी व्यक्ती राम कदमच आहे. त्यांचे बॉलिवूडशी संबंध आहेतच. पण ड्रग्जसंदर्भात त्यांचा जो अनुभव किंवा त्यासंदर्भातील माहिती आहे, ती फार वर्षांपूर्वीपासूनच आहे. विवेक मोईत्रांचा याप्रकरणात मृत्यू झाला होता. हे सगळे त्यांच्या क्लोज सर्किटमधीलच व्यक्ती होत्या. त्यामुळे मला असं वाटतं त्यांची नार्को टेस्ट केल्यावर दोन गोष्टी उघड होतील. एक म्हणजे ड्रग कनेक्शन कधीपासूनचं आहे, आणि कोण-कोण यात सहभागी होतं, हे समजेल. दुसरीकडे तो संदीप सिंह आहे, ज्याने 53 फोन केले भाजप कार्यालयात. त्याचीही माहिती ते देऊ शकतील' , असं सचिन सावंत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

नार्को नाही पाहिजे ती टेस्ट करा : राम कदम

'यामध्ये दोन गोष्टी आहेत, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाला आज 84 ते 85 दिवस पूर्ण झाले. पण याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, त्यामुळे संपूर्ण देशात आणि जगभरात महाराष्ट्र सरकारची छी-थू झाली. एवढं झाल्यावर यांच्याकडे पर्याय उरतो की, ज्या व्यक्ती आक्रमकपणे सरकारवर टीका करतायत, सरकारच्या चुका देशासमोर मांडतायत, त्यांना बदनाम करणं, हाच प्रकार माझ्यासोबत सुरु आहे. नार्को टेस्ट उद्या नाही आता यायला तयार आहे. कुठे यायचं सांगा. आव्हान आहे माझं जाहीरपणे, नार्को नाही पाहिजे ती टेस्ट करा. पण हे करताना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा.' सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर राम कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली.

कंगनाच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यानंतर राम कदम आणि सचिन सावंत यांच्यातील ट्वीट युद्ध

कंगना झाशीची राणी... राम कदम

कंगनाने मुंबईत का येऊ नये? महाराष्ट्र सरकारला कशाची भीती वाटते. जर ती स्वतः पुढे बॉलीवूड मधील ड्रग माफिया, राजकारणी, अभिनेता यांची नावे सांगण्याचं घाडस कंगना दाखवत आहे. याविषयी कंगनाचे कौतुक न करता कंगनाला धमकावण्याचे प्रयत्न केले जात आहे. वास्तवात महाराष्ट्र सरकार कंगनाला घाबरत आहे. कारण तिने नाव सांगितली तर सर्वांची नावे देशासमोर येतील. त्यामुळे तिला धमकावलं जात आहे. मात्र, राज्य सरकार हे विसरत आहे की संपूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे. कंगना झाशीची राणी आहे, ती अशा धमक्यांना घाबरणार नाही.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

कंगना रणौत आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे. "ज्या मुंबईने राहयला घर, खायला अन्न दिलं त्याची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करणाऱ्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा स्त्रीचा निषेध करण्याऐवजी तिची तुलना भाजप आमदार झाशीच्या राणीशी करत आहेत."

महत्त्वाच्या बातम्या : 

कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप

'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget