एक्स्प्लोर

मुंबईत हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी काही कामांना अटीशर्तीसह परवानगी

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात कंटेटमेंट झोन/हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची बंद असलेली बांधकामे आणि मुंबईतील पावसाळ्यापूर्वी प्ररशासनानं करावयाची कामे अटीशर्तींसह सुरु होणार आहेत.

मुंबई : शहरात लॉकडाऊनच्या काळात कंटेटमेंट झोन/हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची बंद असलेली बांधकामे आणि मुंबईतील पावसाळ्यापूर्वी प्ररशासनानं करावयाची कामे सुरु होणार आहेत. मात्र, यासाठी प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्ययक आहे. सार्वजनिक स्वरूपाचे प्रकल्प, रस्ते व पूल विषयक दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, पाणी पुरवठा विषयक कार्ये, पावसाळापूर्व कामे इत्यादी कामांशी संबंधित बांधकामांना देखील 'लॉक डाऊन' मधून काही प्रमाणात सूट मिळणार आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाली आहे. राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काळी उद्योगधंद्यांना अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी. सोशल डिस्टन्सींग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट. कामगारांची राहण्याची व दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणे बंधनकारक. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

  • 'कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले 'लॉक डाऊन' मधून बांधकाम क्षेत्राला काही अटींसापेक्ष काही प्रमाणात सूट देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
  • यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन' वगळून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.‌ तथापि, ही परवानगी काही अटींसापेक्ष राहणार असून अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर परवानगी तात्काळ रद्द केली जाणार आहे. या अटींमध्ये प्रमुख्याने खालील अटींचा समावेश आहे:
  • बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यास महापालिकेच्या विकास नियोजन खात्याच्या प्रमुख अभियंता यांच्याद्वारे यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, अशाच प्रकल्पांना 'लॉक डाऊन'मधून काही अटींसापेक्ष सूट देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
  • वरील अटींनुसार सूट देण्याची कार्यवाही प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.
  • प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरुन कामगार आणण्यास परवानगी नसेल. महापालिका क्षेत्रात उपलब्ध झालेल्या किंवा उपलब्ध असणाऱ्या कामगारांकडूनच काम करवून घेणे आवश्यक.
  • बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची व इतर आवश्यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे.
  • बांधकाम ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सदर ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक.
  • कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करवून घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास आवश्यक ते औषधोपचार करणे.
  • बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यासह मुखावरण (मास्क) नियमितपणे वापरणे बंधनकारक.
  • 'कंटेनमेंट झोन' मधील बांधकामांना वरील नुसार परवानगी देण्यात येणार नाही.
  • वरील तपशीलानुसार महापालिकेद्वारे देण्यात आलेली बांधकाम सुरू करावयाची परवानगी ही काही अटींसापेक्षा देण्यात आली असून सदर अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर परवानगी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.
वरील व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाचे प्रकल्प, रस्ते व पूल विषयक दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, पाणी पुरवठा विषयक कार्ये, पावसाळापूर्व कामे इत्यादी कामांशी संबंधित बांधकामांना देखील 'लॉक डाऊन'मधून काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे. तथापि, ही सूट देखील काही अटींसापेक्ष देण्यात येत असून त्यामध्ये 'कोरोना‌ कोविड 19' बाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे परिपूर्ण पालन करण्याच्या अटीचा प्रामुख्याने समावेश आहे. Kolhapur PPE Kit | इचलकरंजीमध्ये सर्व निकष पाळून पीपीई किटची निर्मिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget