एक्स्प्लोर

BMC : गोपाळकृष्ण गोखले पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीपर्यत पूर्ण करा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

Iqbal Singh Chahal : तांत्रिक बाबींमुळे पुलाच्या कामासाठी अतिरिक्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याची स्पष्टोक्ती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या (Gopalkrishna Gokhale Bridge) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून पुलाचा एक भाग सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त (BMC) तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी  सर्व संबंधितांना दिले आहेत. तांत्रिक बाबींमुळे या पुलाच्या कामांसाठी आतापर्यंत अतिरिक्त कालावधी लागला असला तरीही आता पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावे, असे निर्देशदेखील आयुक्त डॉ. चहल यांनी दिले आहेत. 

गोखले पुलाच्या कामाच्या प्रगतीबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक 17 जानेवारी 2024) बैठक पार पडली, त्यावेळी आयुक्त डॉ. चहल यांनी निर्देश दिले. या बैठकीस आमदार श्री. अमीत साटम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) श्री. विवेक कल्याणकर, पश्चिम रेल्वेचे अधिकारी, प्रकल्प सल्लागार, तांत्रिक पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राईट्स लिमिटेड तसेच दोन्ही कंत्राटदार उपस्थित होते. 

आमदार श्री. अमीत साटम यांनी पुलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेत महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त‍ केले. विविध तांत्रिक अडचणी, क्लिष्ट समस्या व अशा प्रकारचे भव्य स्वरूपाचे काम पहिल्यांदाच होत असल्याने आकस्मिक अडचणी व त्यांचे निराकरण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी आतापर्यंत लागला आहे. असे असले तरीही आता वेगाने कामे करून फेब्रुवारी महिन्यात पुलाची एक मार्गिका सर्वसामान्य जनतेसाठी खुली करावी, अशी अपेक्षा त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे व्यक्त‍ केली.

लोखंडी तुळईची (गर्डर) संपूर्ण जुळवणी 20 नोव्हेंबर 2023  रोजी पूर्ण करून, रेल्वे भागावर सरकविण्याचे काम २ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर लोखंडी तुळई, उत्तर दिशेला 13 मीटर समतल पातळीवर सरकविण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या रस्ता रेषेमध्ये, आरसीसी आधारस्तंभावर लोखंडी तुळई स्थानापन्न करण्यासाठी 7.8 मीटर उंचीवरुन खाली आणण्याचे काम 14 जानेवारी 2024 रोजी पूर्ण करण्यात आले. स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे व भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलेच अशा स्वरुपाचे काम होते. 

गोखले उड्डाणपूल हा भारतातील सर्वात जास्त उंचीवरून म्हणजे 7.8 मीटर उंचीवरून खाली उतरविण्यात येणारा पहिलाच पूल आहे. मुंबई महानगर कार्यक्षेत्रात अशाप्रकारच्या इतर ठिकाणच्या कामात साधारणत: 1 ते दीड मीटर उंचीवरून पूल खाली उतरविण्याची आवश्यकता असते. सदर पुलाच्या बाबतीत जागेची कमतरता, रेल्वे भूभागासाठी एक व महानगरपालिका क्षेत्रासाठी एक असे दोन विविध कंत्राटदार, दोन वेगळे तांत्रिक सल्लागार आणि पश्चिम रेल्वे  प्रशासनाकडून मिळणा-या परवानग्या आदी बाबींची जुळवाजुळव करणे गरजेचे होते.  हा सर्व समन्वय साधून पुलाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. 

रेल्वे भागात 7.8 मीटर उंचीवरून गर्डर खाली उतरविणे हे अत्यंत जिकीरीचे आणि कसोटीचे काम होते. म्हणूनच 2 डिसेंबर 2023 रोजी पुलाचे रेल्वे भागावर लॉचिंगचे काम झाल्यानंतर देखील, पश्चिम रेल्वे  प्रशासन व तांत्रिक सल्लागार यांच्याकडून सर्व चाचण्या, परिक्षण यशस्वी पार पडल्यानंतरच पूल खाली उतरविण्याचे काम 3 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आले. हे सर्व केवळ अतिदक्षता आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून करण्या‍त आले आहे. त्यामुळे सदर लोखंडी तुळई रेल्वे भागावर सरकविणे व निर्धारित जागेवर आणण्यासाठी 7.8 मीटरने उतरविणे ही कामे सर्व संबंधित यंत्रणांनी खूप काळजीपूर्वक, सावधानतेने व रेल्वे मालमत्ता, रेल्वे  प्रवासी यांची काळजी घेऊन केलेली आहेत. त्या‍मुळे तुळई निर्धारित कालावधीत स्थानापन्न करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

गोखले पूल हा 7 नोव्हेंबर 2022 रोजी पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुलाचे काम दिनांक 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. पूल बांधणीसाठी आवश्यक पोलादाचा तुटवडा निर्माण झालेला असताना माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित पोलाद कारखान्यातून लोखंडी प्लेटस् उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर लोखंडी तुळई निर्माण करणा-या अंबाला येथील फॅब्रिकेशन कारखान्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरले. त्यामुळे लोखंडी तुळई निर्माण करण्याच्या कामात सुमारे 15-20 दिवसांचा कालावधी वाढला. तुळईचे सुटे भाग प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामस्थळी आणून जून 2023 मध्ये तुळई जुळवणीचे काम सुरू करण्यात आले.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget