एक्स्प्लोर
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
नवी मुंबईः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. मुंढे यांनी शहरातील झुणका भाकर केंद्राना सील ठोकलं आहे. महाराष्ट्र शासनामार्फत झुणका भाकर केंद्रांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यानंतर मुंढे यांनी नवी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे.
शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या झुणका भाकर योजना बंद झाल्यामुळे राज्य शासनाने 27 जून 2000 च्या परिपत्राकाव्दारे झुणका भाकर केंद्र ताब्यात घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणांना सूचना दिल्या होत्या. काही झुणका भाकर केंद्र संचालकांनी राज्य शासनाच्या या निर्णयाविरुध्द न्यायालयात याचिका दाखल केल्या.मात्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे झुणका भाकर केंद्राच्या जागा ताब्यात घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
झुणका भाकर केंद्रांच्या जागी हॉटेल
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने महापालिका क्षेत्रातील 20 झुणका भाकर केंद्रांना सील ठोकलं आहे.तर 2 केंद्रांना नोटीस बजावली आहे. एका केंद्रचालकाने सदरची जागा खाजगी असून सिडकोने त्यांना ॲमनेस्टी योजनेअंतर्गत वापरासाठी दिली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेबाबत कायदेशीर खातरजमा करण्यात येत आहे.
या झुणका भाकर केंद्रांपैकी अनेकांनी व्यवसायात बदल करत चक्क हॉटेल सुरु केलं असल्याचंही सर्व्हेक्षणात आढळून आलं आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत 20 झुणका भाकर केंद्रांना सील ठोकलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement