एक्स्प्लोर

CNG Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ

महानगर गॅस लिमिटेडने ( MGL) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या (PNG) दरात तीन रुपयांची वाढ केली असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. 

मुंबई: आधीच वाढलेल्या महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता पुन्हा एक झटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता सीएनजी 80 प्रति किलोने खरेदी करावा लागेल तर पीएनजीच्या दरातही वाढ होऊन तो 48.50 रुपये करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.

महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक पत्रक जारी केलं आहे. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 29 एप्रिलमध्ये वाढलेले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसून गेल्या 51 दिवसांपासून ते स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल रुपये स्वस्त होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आजचे कच्च्या तेलाचे दर 
आंतरराष्ट्रीय बाजारातील आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर त्यात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड आज प्रति बॅरल 1.38 डॉलरनं घसरल्यानंतर प्रति बॅरल 102.7 डॉलरच्या दरावर आहे. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.21 डॉलरने घसरल्यानंतर प्रति बॅरल 105.9 डॉलरवर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget