शस्त्रक्रियेनंतर 37 दिवसांनी मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड! अचानक विधानभवनाला भेट; भाजपकडून सवाल
CM Uddhav Thackeray On Field Visit VidhanBhavan : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 37 दिवसानंतर ऑन फिल्ड आले आहेत. काल रात्री 8 वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांनी अचानक विधान भवनाला भेट दिली.
CM Uddhav Thackeray On Field Visit VidhanBhavan : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 37 दिवसानंतर ऑन फिल्ड आले आहेत. काल रात्री 8 वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांनी अचानक विधान भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पाहणी केली. तसेच विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय, समिती सभागृहात जाऊन माहितीही घेतली. डॉक्टरांच्या सल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी चालण्याचा सरावही केला.
मानेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना 22 दिवसांनी म्हणजे 2 डिसेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ उडाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार नितेश राणेंचे सवाल
या भेटीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरंच विधानभवनात गेले तर ही चांगली बातमी आहे. पण ते तिथे असताना सीसीटीव्ही का बंद केले होते? विधानसभेच्या कर्मचार्यांना संध्याकाळी 6 वाजता बाहेर जाण्यास का सांगण्यात आले? हे नेमके रहस्य काय आहे? असे सवाल राणे यांनी उपस्थित केले आहेत.
If Maha CM really walked to Vidhan Bhavan which is good news but why were the CCTV switched off when he was there?
— nitesh rane (@NiteshNRane) December 18, 2021
Why was the Vidhan Sabha staff told to leave by 6 pm ?
What’s the secret?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :