एक्स्प्लोर
कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, मात्र सबुरीनं घ्या : मुख्यमंत्री
मुंबई : राज्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांशी कर्जमाफीबाबत चर्चा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील निवेदनात दिली. शिवाय, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती केंद्राला केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी जी योजना तयार करेल, त्यातील आर्थिक हिस्सा आम्ही उचलायला तयार आहोत. केंद्राने सकारात्मक आश्वासन दिलं आहे. मात्र, हा निर्णय एका दिवसात होणार नसून, त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, जे 70 टक्के शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांच्या मनात असं नको यायला की कर्ज थकीत ठेवल्यावर माफी मिळते. मग आम्ही पण कर्ज थकीत ठेवतो. असं झाल्यास बँकिंग व्यवस्था कोलमडेल, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. शिवाय, अर्थमंत्री आज जे बजेट सादर करतील, ते शेतकऱ्यांसाठीच असेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.
मुख्यमंत्र्याचं परिषदेत निवेदन :
Update : विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, हे जे थकीत शेतकरी आहेत, ते 2012-13 चे आणि आधीचे आहेत.
Update : दोन वर्षे शेतीमध्ये गुंतवणूक केली म्हणून शेती दर अभूतपूर्व वाढला आहे. 30 टक्के शेतकरी असे आहेत ते आणखी कर्ज घेऊ शकत नाहीत. जे 70 टक्के शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांचाही विचार करावा लागेल. त्यांच्यावर अन्याय होऊन चालणार नाही. यातून मार्ग काढला पाहिजे. म्हणून केंद्राकडे गेलो. अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली. याबाबत सकारात्मक ते आहेत. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे.
Update : आत्महत्या थांबवणार का यावर अवकाळी पाऊस येणार नाही याचीही हमी घेणार का? मी जे बोललो तेच विरोधी पक्ष नेते म्हणाले. विविध कारणे आहेत, ज्यामुळे शेतीचे नुकसान होते. म्हणूनच शाश्वत शेती करावी लागेल. गुंतवणूक वाढवावी लागेल. आम्ही विविध उपाययोजना करत आहोत.
Update : आत्महत्यांवर एका दिवसाचे उपाय नाही आहे. उत्पादकता वाढवावी लागेल. राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे. विरोधकांनी अर्थ संकल्प ऐकून घेतला पाहिजे. सरकारने काय उपाययोजना करत आहे ते. राजकारण न करता शेतकरी यांच्या हिताकरता कामकाज करावे अशी विनंती करतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement