एक्स्प्लोर
Advertisement
PNB Scam | पीएनबी बँक घोटाळ्यात सीबीआयकडून पुरवणी आरोपपत्र दाखल
पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सीबीआयनं मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात मुख्य आरोपी नीरव मोदीसह अन्य सहाजणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पुरावे नष्ट करणे, इतर साक्षीदारांना धमकावणे असे नवे आरोप या पुरवणी आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आले आहेत.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सीबीआयने मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात मुख्य आरोपी नीरव मोदीसह अन्य सहाजणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. यात नीरव मोदीसह त्याचा भाऊ नेहल, कंपनीचे निलंबित अधिकारी संजय प्रसाद, अमित मागिया, संदिप मिस्त्री आणि मिहिर भन्साळी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पुरावे नष्ट करणे, इतर साक्षीदारांना धमकावणे असे नवे आरोप या पुरवणी आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आले आहेत.
नेहल, भन्साळी आणि मिस्त्री हे परदेशात पसार झाले असून त्यांना याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नीरव मोदीने नेहलला दुबाईला पाठवून पुरावे नष्ट करण्याचे काम दिले होते. दुबई आणि कैरोमधील बोगस कंपन्यांमार्फत बँकेची आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. तसेच दुबई आणि हाँगकाँगमधील अन्य काही कंपन्यांच्या संचालकांना धमकावल्याचा आरोपही यामध्ये लावलेला आहे. बँकेतून जारी केलेल्या कागदपत्रांवरून परदेशातील काही मालमत्ता आरोपींनी नष्ट केली आहे, असं यामध्ये म्हटलं आहे.
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13, 400 कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झालेले आहेत. यांच्या विरोधात ईडीनं पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन कोर्टापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत. त्यामुळे अखेरीस तपासयंत्रणेनं साल २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार कारवाई सुरू करत जप्त केलेल्या सा-या संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेनं सुरू केली आहे. जेणेकरून त्यांची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होईल.
संबंधित बातम्या
पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट
मी भारतात येऊ शकत नाही, ईडीनं अँटिग्वात येऊन माझी चौकशी करावी, मेहुल चोक्सीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
सरकारला झटका, मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement