एक्स्प्लोर
मुंबईत इमारतीच्या पार्किंग भागाची भिंत खचली!
वडाळ्यात लॉयेट्स इस्टेट इमारतीच्या पार्किंग भागातील भिंत खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई : वडाळ्यात लॉयेट्स इस्टेट इमारतीच्या पार्किंग भागातील भिंत खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची शक्यता आहे.
वडाळ्यातील लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती पार्क ही इमारत आहे. या इमारतीच्या पार्किंग भागाची भिंत खचल्यामुळे मोठा खड्डाच पडला असून यात गाड्यांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना जेथे घडली त्याच ठिकाणी काही कामगार झोपड्या बांधून राहत होते. यातील काही झोपड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याचा दावा केला जात आहे.
तर या घटनेकडे फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल्याचे आरोप स्थानिक नगरसेवक सुफियान वून यांनी केल आहे.
बिल्डरवर गुन्हा दाखल
वडाळ्यामध्ये भिंत खचल्यानंतर आता याप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावं आहेत. दोस्ती बिल्डरनं व्हायब्रेटरच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
आणखी वाचा























