एक्स्प्लोर

BMC Budget 2023 : आज सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, काय आहेत मुंबईकरांच्या अपेक्षा? 

BMC Budget 2023 : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाता त्यावेळी अर्थातच सर्व सोयी सुविधा मुंबईकरांना मिळाव्या हीच अपेक्षा असल्याचे मुंबईकर सांगतात.

Brihanmumbai Municipal Corporation Budget 2023 : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे 2023-24 चा अर्थसंकल्प आज शनिवारी सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तर मुंबई महापालिकेच्या बजेटवर यंदा राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची देखील चर्चा देखील रंगली आहे. आता मुंबईकरांना या बजेटमधून नेमक्या काय अपेक्षा आहेत? शिवाय या बजेटवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया.   

'शाळा, आरोग्य, रस्ते आणि स्वच्छतेसाठी निधीची तरदूत करा' 

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचे बजेट सादर केले जाते तेव्हा अर्थातच सर्व सोयी सुविधा मुंबईकरांना मिळाव्याच हीच मुंबईकरांची यामधून अपेक्षा असल्याचे मुंबईकर सांगतात. मागील वर्षी 45,949 कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 ला संपल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहतात. त्यामुळे तेच मुंबई महापालिकेचे यंदाचे बजेट सादर करतील आणि स्वतः मंजूर करतील. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना काय हवंय? काय द्यायला हवं? आणि कुठल्या घोषणा केल्या जाव्यात? यासाठी विशेष सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्तांना केल्या आहेत. 

बजेटमध्ये कशावर भर दिला जाणार?

मुंबई महापालिका अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  

शिक्षणासाठी विशेष तरतूद करून बीएमसी शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल. 

सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  

 रस्ते काँक्रीटीकरण, सागरी किनारा मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करणे, आरोग्य यंत्रणेसाठी भरीव तरतूद करून विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. 

प्रशासक म्हणून बीएमसी आयुक्त हे बजेट सादर करणार असल्याने मुंबई महापालिकेच्या बजेटवर राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची चर्चा आहे. शिवाय हे बजेट निवडणुकीआधी सादर केले जात असल्याने विरोधकांकडून हे राज्य सरकारचे निवडणूक बजेट असल्याची बजेट सादर करण्याआधीच टीका केली जात आहे. तर हे पूर्ण वर्षभराचं बजेट सादर न करता हंगामी बजेट म्हणून सादर करावं अशी देखील मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बीएमसी अर्थसंकल्पात वाढ होणार असून सर्व समावेशक हे बजेट असेल अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. शिवाय बजेट सादर होण्याआधी या संदर्भात राजकारण तापलं असलं तरी या बजेटमधून मुंबईकरांच्या समस्या जाणून घेऊन, मुंबईकरांच्या अपेक्षांना खरं उतरणारं बजेट असेल का? याचं उत्तर  बजेटच्या दिवशीच मिळणार आहे. त्यामुळे या बजेटकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष असणार आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Embed widget