एक्स्प्लोर
श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरुन बोनी कपूर यांचं ट्वीट
बोनी कपूर यांनी अत्यंत भावूक होऊन हे पत्र लिहिले आहे. मात्र यातून त्यांनी चाहत्यांसह सगळ्यांनाच आवाहन केले आहे की, दु:खातून बाहेर पडण्यासाठी आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा.

मुंबई : 24 फेब्रुवारी रोजी रात्री प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली. कपूर कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला. आज श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पत्रक ट्वीट करुन, त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बोनी कपूर यांनी अत्यंत भावूक होऊन हे पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चाहत्यांसह सगळ्यांनाच आवाहन केले आहे की, दु:खातून बाहेर पडण्यासाठी आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा. बोनी कपूर यांनी पत्रकात काय म्हटलं आहे?
"आम्हाला आधार देणारे माझे कुटुंबीय, मित्र परिवार, सहकारी, हितचिंतक आणि श्रीदेवी यांच्या असंख्य चाहत्यांचा मी आभारी आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, अर्जुन आणि अंशुला यांचं प्रेम खुशी, जान्हवी आणि माझ्यासोबत आहे. आम्ही एकत्रितपणे या दु:खद घटनेला सामोरं गेलो. जगासाठी श्रीदेवी एक 'चांदनी' होती. एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. मात्र माझ्यासाठी ती प्रेयसी, मैत्रीण आणि माझ्या मुलींची आई होती. माझी सहचारिणी होती. माझ्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती. त्यांचं आयुष्य होती. तिच्याभोवतीच आमचं कुटुंब फिरत असायचं. श्रीदेवीला निरोप देताना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की, आमचं दु:खं आम्हाला वैयक्तिकरित्या व्यक्त करु द्यावं. ती एक अशी अभिनेत्री होती, जिला पर्याय नाही. कुठलाच कलावंत पडद्याआड जात नाही, तो चंदेरी पडद्यावर चमकत राहतोच. माझ्या मुलींचा सांभाळ करणं, याला सध्या माझं प्राधान्य आहे आणि श्रीदेवीशिवाय पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ती आमचं आयुष्य होती, ताकद होती आणि कायम हसतमुख राहण्याचं कारण होती. तिच्यावर खूप प्रेम करत होतो. रेस्ट इन पीस, माय लव्ह. आमचं आयुष्य आता पहिल्यासारखं नसेल." बोनी कपूरदरम्यान, श्रीदेवी यांच्या ट्वीटर हँडलवरुन बोनी कपूर यांनी हे ट्वीट केले आहे. यापुढे श्रीदेवी यांचं ट्विटर हँडल सुरु ठेवण्यात येईल की बंद करण्यात येईल, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती नाही.
— SRIDEVI BONEY KAPOOR (@SrideviBKapoor) February 28, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























