एक्स्प्लोर
Advertisement
14 मार्च 2016 ते 4 मे 2018, भुजबळांची अटक ते जामीन, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सध्या भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.
भुजबळांना अटक ते जामीन
14 मार्च 2016
सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी ईडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी भुजबळांनी मीडियाशी बातचित केली.
11.30 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांच्या एका विशेष पथकाने चौकशी सुरु केली. जवळपास सव्वा दोन तास चौकशी सुरु होती.
दुपारी 2.15 वाजता भुजबळांनी हॉटेलातून मागवलेलं जेवण घेतलं. यात रोटी, भाजी, डाळ, रायता असा हलका आहार होता.
दुपारी 3.30 वाजता वॉशरुममधून फ्रेश होऊन आल्यावर पुन्हा त्यांची चौकशी सुरु झाली.
संध्याकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास भुजबळांनी कमी साखरेचा चहा घेतला
रात्री 9 वाजता पुन्हा हलका आहार घेतला. मात्र प्लेटमध्ये जेवण अर्धवट टाकलं.
रात्री 9.30 वाजता ईडीकडून छगन भुजबळांना अटक
रात्री 10 वाजता मीडियासमोर अटकेच्या वृत्ताला दुजोरा
रात्री 11 वाजता एक रजई, उशी आणि काही कपडे मागवण्यात आले. सोबतच औषधही आणली गेली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री 12.15 वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली.
ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील एका एसी खोलीतल्या लॉक अप रुममध्ये त्यांची रवानगी केली.
लॉकअप रुममध्ये जाण्यापूर्वी ते वॉशरुमला जाऊन आले आणि खोलीत शांतपणे बसून राहिले.
अधिकाऱ्यांनी 'काही हवंय का?' अशी दोनवेळा विचारणा केली. मात्र भुजबळांनी काहीच उत्तर दिलं नाही
खोलीत पाण्याची बाटली ठेवण्यात आली. रात्री खोलीचे दिवेही लावले नव्हते.
15 मार्च 2016
सकाळी 7.30 वाजता ईडी अधिकाऱ्यांनी रुममध्ये प्रवेश केला, त्यावेळी भुजबळ जागेच होते. त्यानंतर ते 2 वेळा वॉशरुमला गेले आणि चहा घेतला.
8.30 वाजता भुजबळांना पोहे आणि कमी साखरेचा चहा दिला गेला. मात्र पोहे पूर्ण खाल्ले नाहीत.
9.30 वाजता पुन्हा चौकशीला सुरुवात झाली. ईडीच्या विशेष पथकाने चौकशी सुरु केली. दुसऱ्या टीमने रिमांड कॉपी तयार केली.
लंच टाईमनंतर छगन भुजबळ यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. त्यानंतर मुंबई सेशन्स कोर्टात हजर करण्यात आलं.
04 मे 2018
छगन भुजबळ यांना जामीन मंजूर. 5 लाख रुपयांच्या जामीनावर सुटका, बोलावतील तेव्हा चौकशीसाठी तपासयंत्रणांपुढे हजर राहण्याची अट
संबंधित बातमी
अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र
भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement