(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पिण्यायोग्य करणार; मुंबई महापालिकेचा प्रयोग, 250 कोटींचा खर्च अपेक्षित
कुलाबा येथे प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.याकरता महापालिकेनं (BMC) निविदेची जाहिरात दिली आहे. महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
BMC News: मुंबईत सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करण्याकरता उपक्रम मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Mahapalika) राबवण्यात येणार आहे. कुलाबा येथे प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.याकरता महापालिकेनं (BMC) निविदेची जाहिरात दिली आहे. मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, पुढील दोन वर्षांत हा प्रयोग यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून नवनवीन प्रयोग राबवण्यात येतात.
पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी
मात्र पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे हा मुंबई महापालिकेचा पहिलाच प्रयोग आहे.
प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कुलाबा, नेव्ही नगर या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले.
मुंबईला दररोज 4 हजार दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज
दरम्यान, वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला दररोज 4 हजार दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नवीन स्त्रोतांचा शोध घेतला जात असून कुलाबा येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
15 वर्षे देखभालीची जबाबदारी कंपनीची
प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. जी कंपनी हा प्रोजेक्ट घेईल त्या कंपनीवर 15 वर्षे देखभालीची जबाबदारी राहणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पात्र कंपनीला काम दिल्यानंतर पुढील 15 वर्षे त्या ट्रीटमेंट प्लाॅटची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune News: पुणेकरांची पाण्याची 'हौस' फुल्ल होणार! शहराला पाणीपुरवठा करणारे चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली