एक्स्प्लोर

Pune News: पुणेकरांची पाण्याची 'हौस' फुल्ल होणार! शहराला पाणीपुरवठा करणारे चारही धरणं पुर्ण क्षमतेनं भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार धरणे पूर्ण क्षमतेने आहेत. विशेषत: पाणलोट क्षेत्रात सतत पडलेल्या पावसामुळे ही धरणं तुडूंब भरली आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार चार धरणांचा एकत्रित पाणीसाठा 100 टक्के (29.15 टीएमसी) आहे.

Pune News:  पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार धरणे पूर्ण क्षमतेने आहेत. विशेषत: पाणलोट क्षेत्रात सतत पडलेल्या पावसामुळे ही धरणं तुडूंब भरली आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणांचा एकत्रित पाणीसाठा 100 टक्के (29.15 टीएमसी) आहे.

मागील वर्षी याच दिवशी चार धरणांतील एकत्रित पाणीसाठा 96.16 टक्के होता. (28.02 टीएमसी). प्रशासनाने धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. खडकवासला धरणातून 4 हजार 708 क्युसेक, पानशेत धरणातून 1 हजार 954 क्युसेक, वरसगाव धरणातून 570 क्युसेक आणि टेमघर धरणातून 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत अंदाजे 11.08 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

 यंदा कडाक्याच्या उन्हानंतर मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. यासह मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लहान प्रकल्पाची धरणे ओसंडून वाहू लागली. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 धरणे भरली आहेत. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली 
पुण्यात पावसाळ्याआधी पाणीकपातीची परीस्थीती निर्माण झाली होती. त्यासोबत पिंपरी-चिंचवड परिसरात देखील तिच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र काही दिवसातच पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला होता. यावर्षी पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणार पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा झाल्याने पाण्याबाबत पुणेकरांना समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेला पुर्णविराम लागला आहे.

 चार धरणांमधील पाणीसाठा :

खडकवासला: 1.97 टीएमसी (100%)

पानशेत: 10.65 टीएमसी (100%)

वरसगाव: 12.82 टीएमसी (100%)

टेमघर: 3.71 टीएमसी (100%)


जिल्ह्यातील 18 धरणात पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा
पुणे (Pune) जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी (Dam) 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget