एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेचे दवाखाने महागणार
मुंबई महापालिकेच्या सभागृहात या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयात लागू होईल.
मुंबई: मुंबई महापालिकेचे दवाखाने महागणार आहेत. कारण, रुग्णालय शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुंबई बाहेरील रुग्णांसाठी 30 टक्के वाढ, तर मुंबईतील नागरिकांना उपचारासाठी 20 टक्के वाढीव शुल्क द्यावं लागणार आहे. मात्र जेष्ठ नागरिकांना महापालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयात लागू होईल.
महापालिका रुग्णालयं अत्याधुनिक करण्याठी ही दरवाढ करण्यात आल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
असं असलं तरी एमआरआय आणि सिटीस्कॅन यासारख्या सुविधा यातून वगळ्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयात मुंबईकरांसोबतच मुंबई बाहेरील रुग्णही मोठ्या संख्येनं उपचार घेतात. पालिकेच्या केईएम,नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयावर महापालिका वर्षाला 600 ते 700 कोटी रुपये खर्च करते.
त्यापैकी दहा टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत. तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. म्हणून पालिका रुग्णालयातील सेवा अद्ययावत करण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement