एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे संकेत
![उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे संकेत Bmc Election Shivsena Individually Fight उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे संकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/18085008/uddhav-thackeray-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. शाखा निहाय बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज मातोश्री येथे वर्सोवा, अंधेरी पूर्व - पश्चिम, विलेपार्ले आणि वांद्रे पूर्व - पश्चिम येथे शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कार्यकर्त्यांना सूचना देताना उद्धव ठाकरे यांनी आता असे लढा की या पुढे कोणाकडेच जाण्याची गरज लागणार नाही, स्वबळावर आपला महापौर बसवू असे स्पष्ट शब्दात सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युतीसाठीच्या तीन बैठकीतून काही निष्पन्न न झाल्याने आणि वेळ हातातून निघून जात असल्याने आता युतीची शक्यता धूसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)