एक्स्प्लोर
अमित शाह मुंबईत दाखल, विमानतळावर शक्तीप्रदर्शन
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं मुंबईत आगमन झालं आहे. मुंबई विमानतळावर अमित शाह यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राज पुरोहित हे शाह यांच्या स्वागतासाठी हजर होते.
अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान, अमित शाह विमानतळहून दादरच्या चैत्यभूमीला रवाना झाले. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर, शिवाजी पार्कवरील वीर सावरकरांच्या पुतळ्याला अमित शाहांनी अभिवादन केलं.
या दौऱ्यात सर्वांच्या नजरा अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर असणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवर चर्चा होणार आहे.
गेल्या दोन्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएत असूनही यूपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती. त्यामुळे अमित शाह हे स्वतः उद्धव ठाकरेंची भेट घेऊन एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करणार असल्याचं समजतं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement