एक्स्प्लोर
बेताल वक्तव्याप्रकरणी राम कदम यांचा माफीनामा
जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.
मुंबई : दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. तीन दिवसांनी राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."
फक्त माफी नको, आमदारकी रद्द करा : चित्रा वाघ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या क, "फक्त माफी मागून भागणार नाही, राम कदम यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशीच मागणी माता-भगिनींची आहे. जो न्याय प्रशांत परिचारक यांना लावला तोच न्याय राम कदम यांना लावायला हवा होता. दोन दिवस महिला रस्त्यावर आल्यानंतर राम कदम यांनी माफी मागितली आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल."
राम कदमांकडून नाईलाजाने माफी : निलम गोऱ्हे
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती, कारण स्त्रियांवरील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण अशाप्रकारच्या गुन्हेगारांना आणि चिथावणी देणाऱ्यांबाबत मौन बाळगलं. राम कदमांनी अगदी नाईलाजाने माफी मागितली आहे. आंदोलन झालं आणि एबीपी माझासह सर्व माध्यमांनी धारेवर धरल्यानंतर त्यांनी नाईलाजाने माफी मागितली आहे. त्यामुळे ती माफी मनापासून आहे की नाही हा प्रश्न आहे," असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.
राम कदम यांचं पहिलं स्पष्टीकरण
या प्रकारानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल, अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका, असं राम कदम म्हणाले. यानंतर एबीपी माझाने राम कदम यांना संपूर्ण व्हिडीओ दाखवला. त्यानंतर राम कदम यांनी आपला म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावेळचं वातावरण हलकं फुलकं होतं. काही राजकीय पक्ष या व्हिडीओचं राजकारण करत आहेत, असं राम कदम म्हणाले होते.
महिला आयोगाकडून दखल
भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याची महिला आयोगाकडून स्वाधिकारे दखल घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत.
घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार राम कदम यांनी महिलांविषयक बेताल वक्तव्य केलं होतं. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून त्याचं वार्तांकन झालं होतं. या पार्श्वभूमीवर कदम यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
संबंधित बातम्या
..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम
राम कदमांना 8 दिवसांत उत्तर देण्याचे महिला आयोगाचे आदेश
राम कदमांविरोधात आंदोलन, काँग्रेस महिलांचा आपापसातच वाद
धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी
"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"
प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!
पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल
राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement