एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत बॅट टाकली नाही, इनिंग डिक्लेअर केलीय : आशिष शेलार
मुंबई : मुंबईत माघार घेऊन इनिंग डिक्लेअर केली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये समोरच्या टीमला आऊट करण्यासाठी चान्स घेतलाय, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापौरपद, राज्यातील सत्ता, शिवसेना इत्यादी मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.
मुंबईकरांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिला आहे. मुंबईकरांचं पारदर्शकतेला समर्थन आहे. त्यामुळे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप ठाम राहील, असे आशिष शेलार म्हणाले.
त्याचसोबत, तडजोडी टाळण्यासाठी मुंबईत माघार घेतली, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
राज्यातील सरकारला काहीही धोका नाही. सरकार आज स्थिर आहे. मुळात जे अस्थिर करु शकतील तेही सरकार पाडण्याचं बोलत नाहीत. मग सरकार पडण्याच्या काल्पनिक चर्चा का, असा सवाल करत राज्य सराकरला धोका नसल्याचे आशिष शेलार यांनी विश्वास व्यक्त केला.
आशिष शेलार यांचे ‘माझा कट्टा’वरील महत्त्वाचे मुद्दे -
- भाजपने मुंबईत माघार घेतली नाही, फक्त भूमिका जाहीर केली - आशिष शेलार
- मुंबईकरांनी कुणालाही संपूर्ण बहुमत दिलेलं नाही - आशिष शेलार
- पारदर्शकतेचा मुद्दा मांडला, त्यावर जनतेने भाजपला कौल दिला - आशिष शेलार
- मुंबईतील जनतेचा कौल मान्य करुन निर्णय घेतला - आशिष शेलार
- तडजोडी टाळण्यासाठी माघार घेतली - आशिष शेलार
- पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप ठाम राहणार - आशिष शेलार
- राज्य सरकारला काहीही धोका नाही - आशिष शेलार
- मुंबईत पहारेकरी म्हणून काम करु - आशिष शेलार
- सरकार आज स्थिर आहे, जे अस्थिर करु शकतील तेही सरकार पाडण्याचं बोलत नाहीत - आशिष शेलार
- मुंबईत आम्ही इनिंग डिक्लेअर केलीय - आशिष शेलार
- मुंबईतील निर्णयाला पंतप्रधानांचा पाठिंबा आहे का, याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील - आशिष शेलार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement