एक्स्प्लोर
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण
नवीन गवते यांनी हरिश पांडे यांचा गळा आवळला आहे. नवीन गवते हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दिघा अनधिकृत प्रकारणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.
नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस हरीश पांडे यांना राष्ट्रवादीचे दिघा येथील नगरसेवक नवीन गवते यांनी मारहाण केली आहे. आपल्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना घेऊन नवीन गवते यांनी पांडेंना मारहाण केली. हरीश पांडे यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
दिघा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम घेण्यावरुन ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. नवीन गवते आणि त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे.
नवीन गवते यांनी हरिश पांडे यांचा गळा आवळला आहे. नवीन गवते हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दिघा अनधिकृत प्रकारणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.
नगरसेवकाकडून अशा पद्धतीने मारहाण करुन लोकांमध्ये दहशत पसरवली जात असल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मारहाणीत हरीश पांडे यांना दुखापत आली असून, उपचारासाठी वाशी मनपा रुग्णालयात दाखल केले आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement