एक्स्प्लोर
भाजपचा इंटर्नल सर्व्हे, 39 आमदारांचं भवितव्य धोक्यात, मुख्यमंत्र्यांची नेत्यांना तंबी
भाजपची शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेवरुन (इंटर्नल सर्व्हे) आपल्या नेत्यांना सावधानतेचा इशारा दिला.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत पक्षातील नेत्यांची शाळा घेतली. फडवीस यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहण्याची समज दिली आहे. इतकंच नाही तर अनेक आमदार-खासदारांचं भवितव्यही धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपची शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेवरुन (इंटर्नल सर्व्हे) आपल्या नेत्यांना सावधानतेचा इशारा दिला.
भाजपच्या इंटर्नल सर्व्हेनुसार 122 पैकी 39 आमदार, तर 23 पैकी 11 खासदारांचं भवितव्य धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत असल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी खडसावलं.
प्रत्येक आमदार -खासदाराचं रिपोर्ट कार्ड बनवून कामाचा अहवाल घेतला जाणार आहे. काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना येत्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आमदार- खासदारांना स्वतःच्या मतदारसंघासोबतच 2014 च्या निवडणुकीत, भाजप पराभूत झालेल्या मतदारसंघातही लक्ष घालण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजपची स्वबळावर लढण्यासाठी जोरदार हालचाली आतापासूनच सुरु करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement