एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीपीसीएल कंपनी महत्त्वाची का?
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल कंपनी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते.
बीपीसीएल प्लान्ट स्फोट मुंबई : मुंबईतील 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात 'बीपीसीएल' कंपनीच्या प्लान्टमध्ये स्फोट झाला. यामुळे चेंबुर-वडाळ्यासह माहुलगाव परिसर हादरला आहे. या प्लान्टमध्ये अनेक कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर परिसरात आग आणि धुराचे लोट पसरले.
बीपीसीएल कंपनी महत्त्वाची का?
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल कंपनी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. मुंबईत बीपीसीएलचं मुख्यालय आहे. तेल आणि गॅस निर्मिती करणारी ही कंपनी असून मुंबई आणि कोचीनमध्ये दोन सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत.
डी. राजकुमार हे बीपीसीएलचे विद्यमान चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
जगातील महाकाय 500 कंपन्यांच्या यादीत 2016 साली 'फॉर्च्युन' मासिकाने बीपीसीएलला 358 वं स्थान दिलं होतं.
24 जानेवारी 1976 रोजी बर्मा शेल ग्रुप ऑफ कंपनीला भारत सरकारने टेकओव्हर केलं आणि 'भारत रिफायनरिज लिमिटेड' अशी कंपनी स्थापन केली. त्यानंतर 1 ऑगस्ट 1977 रोजी केंद्र सरकारने या कंपनीचे 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात बीपीसीएल असे नामकरण केले.
भारतात बीपीसीएलच्या चार मोठ्या रिफायनरी आहेत :
1. मुंबई रिफायनरी (वार्षिक 13 MMT/मॅट्रिक मिलियन टन क्षमता)
2. कोचीन (केरळ) रिफायनरी (वार्षिक 15.5 MMT क्षमता)
3. बिना (मध्य प्रदेश) रिफायनरी (वार्षिक 6 MMT क्षमता) - या रिफायनरीची ओमान ऑईल कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर आहे.
4. नुमालिगढ (आसाम) रिफायनरी (वार्षिक 3 MMT क्षमता)
पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादनांचं संशोधन (exploration), निर्मिती (production) आणि विक्री (retailing) असं बीपीसीएलच्या कामाचं क्षेत्र आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील बीपीसीएलचं नेटवर्क सर्वात भक्कम आणि मोठं असल्याचं मानलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement