एक्स्प्लोर
Advertisement
बेस्ट कामगारांना सात नाही तर साडेतीन हजार वेतनवाढ : अनिल परब
ज्युनिअर कामगारांना 7 हजार वेतनवाढ मिळेल असे राव यांनी लिहून घेतल्याचे सांगितले. मात्र हे खरं नसून त्यांना 3428.78 रुपये वाढ फक्त मिळणार आहे. पण ज्यांना हे 7 हजार रुपये वाढवून मिळतील त्यांनी आपली रिसीट दाखवा मी शब्द मागे घेईन, असे परब म्हणाले.
मुंबई : बेस्ट कामगारांना 7 हजार नव्हे तर 3,428 एवढीच वेतनवाढ मिळणार असल्याचं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं आहे. तसेच शशांक राव यांच्या मागे 3 जणांचे अदृश्य हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बेस्ट कामगारांचा संप मिटला असला तरी आता त्यावरुन राजकारण सुरु झालं आहे. कारण कामगार नेते शशांक राव यांच्यावर आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून थेट निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिका आणि बेस्टवर शिवसेनेची सत्ता आहे. अनेक संघर्षात शिवसेनेने मध्यस्ठीची भूमिका बजावली. मात्र संपाचे निमित्त करून शिवसेनेवर आरोप केले. आमची बांधिलकी मुंबईतील जनतेशी आणि कामगारांशी आहे, असे परब म्हणाले. जनता आणि कामगार यांच्यात सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.
या संपातून कामगारांच्या हातात काय मिळालं हे त्यांना कळावं यासाठी हे सांगतोय. 9 दिवस जनतेला वेठीस धरून काय मिळालं? शशांक राव यांनी कामगारांना जे सांगितलं आणि कोर्टाची ऑर्डर यात तफावत आहे. समितीने 6 मुद्दे लिफाफ्यात कोर्टासमोर ठेवले. महापौर बंगल्यात जे पैसे ऑफर केले त्यात सगळ्या कामगारांना एकत्रित विचार करून केलेले. शशांक राव यांनी ज्युनियर कामगार यांची मागणी रेटून घेतली आणि बोलणी चिघळली. शशांक राव यांनी फक्त माथी भडकावण्याचे काम केले. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्या कुणी तरी लिहिले असावे, शशांक राव यांनी कामगारांची फसवणूक केली, अशी टीका परब यांनी केली.
परब म्हणाले, शिवसेनेला बदनाम करणे हा अदृश्य हाताचा हेतू होता आणि तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. नारायण राणे, कपिल पाटील, आशिष शेलार यांनी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे अदृश्य हात कोणाचे आहेत हे यावरून समोर आले, असे परब यांनी सांगितले. राव यांची कीव वाटते की ते कुणाच्या सांगण्यावरून असे वागत होते. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे राजकारण केले गेले, असे ते म्हणाले.
शशांक राव यांचा दावा आणि हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत यात तफावत असून शशांक राव हे कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत. संप करून काही मिळत नाही. चर्चेतून मार्ग निघतो हे आता या संपावरून पालिका कर्मचाऱ्यांना समजले. त्यामुळे ते आता राव यांच्या भाषणांना बळी पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. ‘बेस्ट’मधील कनिष्ठ कामगारांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा पण त्याच सोबत अन्य कामगारांचेही प्रश्न सुटले पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका होती. पण शशांक राव संप ताणत होते. म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला, असे परब यांनी स्पष्ट केले.
ज्युनिअर कामगारांना 7 हजार वेतनवाढ मिळेल असे राव यांनी लिहून घेतल्याचे सांगितले. मात्र हे खरं नसून त्यांना 3428.78 रुपये वाढ फक्त मिळणार आहे. पण ज्यांना हे 7 हजार रुपये वाढवून मिळतील त्यांनी आपली रिसीट दाखवा मी शब्द मागे घेईन, असे परब म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement