बेस्ट कामगारांचा संप मिटण्याची शक्यता
पावर तोडगा काढण्यासाठी दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरीष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक आयेजित करण्यात आली आहे, अशी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली.
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालय बेस्ट संपापाबत दुपारी 3 वाजता मुंबई निकाल देणार आहे. कामगार संघटनेनेही हायकोर्टात तडजोडीसाठी तयारी दर्शवली आहे. प्रशासनाकडूनही संप मिटवण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना गेल्या चार दिवसांपासून होत असलेला त्रास संपण्याची शक्यता आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याची नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे, असं राज्य सरकारने उच्च न्यायलयात आपली बाजू मांडताना म्हटलं. संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरीष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक आयेजित करण्यात आली आहे, अशी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली.
तर मुंबई महापालिका आयुक्त आणि संपकरी कामगारांच्या नेत्यांनाही बैठकीत सामिल होण्याचं राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. या बैठकीआधी दुपारी 3 वाजता पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक आयुक्तांनी खाजगी बसमालक संघटनेसोबत बैठक बोलावली आहे.
बेस्ट कामगार संघटनांनी उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटलं की, संप अचानक पुकारलेला नाही. संपाची आगाऊ नोटीस देण्यात आली होती, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा ही अनुदानितच राहिली पाहीजे, ती नफ्यावर चालवण्याची अपेक्षा करणं चुकीचं असल्याचंही कामगार संघटनांनी सांगितलं.
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका प्रशासनाला आम्हाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास काय अडचण आहे? असा सवाल संपकऱ्यांनी यावेळी केला.
संबंधित बातम्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार? बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प