एक्स्प्लोर

BEST Premium Bus: बीकेसी ते ठाणे 'बेस्ट' प्रवास; आजपासून सुरू होणार नवीन प्रीमियम सेवा

BEST Premium Bus: मुंबईकरांसाठी बेस्टची प्रीमियम सेवा. ठाणे-बीकेसी मार्गावर आता 'चलो बस' धावणार. ठाणे (Thane) ते वांद्रे कुर्ला (Kurla) संकुलादरम्यान (BKC) नवीन प्रीमियम बस सेवा आजपासून सुरू.

Mumbai BEST Chalo Bus: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट परिवहन उपक्रमांतर्गत 12 डिसेंबरपासून ठाणे (Thane) ते वांद्रे कुर्ला (Kurla) संकुलादरम्यान (BKC) नवीन प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यातून मुंबईला (Mumbai News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होणार येत्या सोमवारपासून सुरू होणारी ही सेवा पूर्णपणे वातानुकूलित आणि आरामदायी असणार आहे. सोमवार ते शनिवार अशी ही सेवा असणार आहे. बीकेसी ते ठाण्यादरम्यान प्रत्येकी 30 मिनिटांच्या अंतरानं ही सेवा धावणार आहे. चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील. दिवसभर धावणाऱ्या बससाठी वांद्रे रेल्वे स्थानक (Bandra Railway Station) ते कुर्ला संकुलापर्यंत 50 रुपये भाडे आहे. तर वांद्रे कुर्ला संकूल (Bandra Kurla Complex) ते ठाण्यापर्यंत 205 रुपये भाडे आकारले जाणार आहे. या नवीन प्रीमियम बस सेवेत (BEST Premium Bus) प्रवाशांसाठी खास स्वागत सवलत योजना देण्यात आली आहे. एकेरी भाड्यात 5 बस फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. 

बेस्टच्या या प्रीमियम सेवेचा मार्ग कसा असेल? 

एक्सप्रेस मार्गावर ठाणे ते बीकेसी दरम्यान सकाळी 7 ते सकाळी साडे आठपर्यंत 30 मिनिटांच्या अंतरानं या बसेस धावतील. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ते ठाणे दरम्यान संध्याकाळी 5.30 ते 7 पर्यंत बससेवा सुरू राहील. ऑल डे रुटसाठी बीकेसी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी 8.50 ते संध्याकाळी 5.50 पर्यंत बससेवा असेल. तसेच वांद्रे स्टेशन ते बीकेसी दरम्यान सकाळी 9.25 ते संध्याकाळी 6.25 पर्यंत या प्रीमियम बस चालवल्या जातील.

बसचं आरक्षण कसं कराल? 

ही बससेवा सुरू झाल्यामुळे देशात इलेक्ट्रिक प्रीमियम बस सुरू करणारी बेस्ट ही पहिली संस्था ठरणार आहे. या बससेवेचे आरक्षण चलो अॅप वरून आपल्या घरात बसून करता येणार आहे. या बससेवेसाठी वांद्रे स्थानक ते बीकेसी दरम्यान तिकीट दर 50 रुपये असेल, तर ठाणे ते बीकेसी दरम्यान 205 रुपये भाडे अॅप वरून आकारण्यात येईल.

नव्यानं बेस्टचं चलो अॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांना ठाणे–बीकेसी दरम्यान पहिल्या पाच फेऱ्या 100 रुपयांत प्रवास करता येणार असून वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या 5 फेऱ्यांचा प्रवास 10 रुपयांत करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रवासी ज्या ठिकाणांहून तिकीट बुक करणार त्या ठिकाणांहून प्रवाशाला प्रवास करता येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढलाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget