Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Pune Accident News: भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत, ज्यात अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते आहे.
पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या (Pune Accident News) अनेक घटना घडत असल्याचं चित्र आहेत. बेशिस्तपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, अतिवेगात वाहने चालवणे अशा एक ना अनेक कारणामुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी जातात. अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थीनींचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली आहे (Pune). हिंजवडीमध्ये भरधाव वेगात निघालेला रेडिमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं (Pune Accident News) नियंत्रण सुटलं. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी (Pune Accident News) झाला, पण दुर्दैवाने डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली, दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे
या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत, ज्यात अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, अनेक जण वळणावर पुढची वाहने जाईपर्यंत थांबतात, काही वाहनांचा वेग हळू आहे, इतक्यात एका बाजुने या विद्यार्थींनी येतात, तर दुसरीकडून रेडिमिक्स डंपर स्पीडमध्ये येतो, आणि क्षणार्धात काही सेकंदात त्या दोघीही त्या डंपरखाली चिरडल्या जातात, आणि शेजारीच आणखी एक तरूण थोडक्यात बचावल्याचं दिसून येतं.
या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, या घटनेनंतर परिसरातील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि विशेषतः वळणांवर वेग नियंत्रित ठेवावा, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र, त्याचे पालन न करता, त्याउलट वाहतुकीचे सर्व नियम बाजुला सारून चालक सर्रासपणे कसेही वाहन चालवताना दिसतात.
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही pic.twitter.com/Ws2rA23Igu
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 25, 2025
दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी
या घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी शेजारून दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. ही घटना हिंजवडी- माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ काल (शुक्रवारी 24 रोजी) दुपारी घडली असल्याची माहिती आहे. डंपरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रांजली महेश यादव (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या.
मृतदेहाचे तुकडे फावड्याने...
पलटी झालेल्या या डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होतं. चालकाचं वळणावरतीच डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या बोजाखाली दबल्या गेलेल्या या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटूंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.