Mumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा
Mumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा
वाल्मिक कराडला (Walmik Karad) सगळे का घाबरतात? त्याच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्यामुळेच त्याला सगळे घाबरतात का? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केलाय. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबईत शनिवारी (दि. 25) जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चातून जितेंद्र आव्हाड बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लढाई गर्दी नाही तर दर्दी लढत असतात. गर्दीवर काही नसतं. आपण कोणत्या जाणिवेतून लढाई लढतो हे महत्त्वाचे आहे. वाल्मिक कराड आजारी आहे असे म्हणतात. माझ्या माहितीनुसार तो आरामात रुग्णालयात झोपला आहे. आता त्याला मोठे आजार होतील आणि तो मस्त आराम करेल. माझ सांगणं आहे की सोडूनच द्या ना त्याला, असे त्यांनी म्हटले.