एक्स्प्लोर
Advertisement
लग्नाचं वऱ्हाड हॉलवर नेण्यासाठी आता 'बेस्ट' ऑप्शन
मुंबई : लग्नाचं वऱ्हाड समारंभस्थळी नेण्यासाठी आता एक 'बेस्ट' पर्याय खुला झाला आहे. मुंबईकरांना लग्नाला वऱ्हाड न्यायला गाडीच मिळत नसेल, तर यजमानांना 'बेस्ट'च्या गाड्या उपलब्ध होणार आहेत. वाजवी दरात या बस भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यजमानांच्या मागणीनुसार सिंगल आणि डबलडेकर बसही मिळू शकणार आहे. लग्न समारंभाव्यतिरिक्त चित्रीकरणासाठीही ‘बेस्ट’ बस मिळणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. या उपक्रमाचा फायदा घेण्याचं आवाहन ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केलं आहे.
‘बेस्ट’ची बस हवी असेल तर ‘बेस्ट’चा टोल फ्री क्र. 1800 227550 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या गाड्यांच्या बुकिंगसाठी www.bestundertaking.com या वेबसाइटवरही माहिती आणि दरपत्रक देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement