एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘बेस्ट’ बजेट : भाडेवाढीच्या प्रस्तावासह खासगी बस आणण्याचाही विचार
बेस्टला चालू वर्षात 590 कोटींचा तोटा झाल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. इतकंच नाही, तर चालू वर्षातल्या पालिकेच्याच बजेटला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना बेस्टनं पुढच्या वर्षीचा आपला 5 हजार 724 कोटींचा अर्थसंकल्प बेस्टच्या समितीत सादर केला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ने बजेट सादर केले आहे. यात भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. शिवाय, आतापर्यंत स्वत:च्या बस चालवणारी ‘बेस्ट’ आता खासगी बस घेऊन सेवा देण्याच्याही विचारात आहे.
बेस्टला चालू वर्षात 590 कोटींचा तोटा झाल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. इतकंच नाही, तर चालू वर्षातल्या पालिकेच्याच बजेटला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना बेस्टनं पुढच्या वर्षीचा आपला 5 हजार 724 कोटींचा अर्थसंकल्प बेस्टच्या समितीत सादर केला आहे.
2018-19 मध्ये ‘बेस्ट’ची प्रस्तावित भाडेवाढ :
‘बेस्ट’च्या तिकीट दरात पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाही. मात्र 4 किलोमीटरनंतर 1 रुपया ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सूचवण्यात आली आहे.
प्रस्तावित भाडेवाढ अशी असेल :
- 6 किमीसाठी सध्या भाडे – 14 रु. (प्रस्तावित भाडे - 15 रु.)
- 8 किमीसाठी सध्या भाडे - 16 रु. (प्रस्तावित भाडे – 18 रु.)
- 10 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 22 रु.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement