एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राणी बागेतील पेंग्विन पाहणं सामन्यांच्या आवाक्याबाहेर?
![राणी बागेतील पेंग्विन पाहणं सामन्यांच्या आवाक्याबाहेर? Bcm Proposal Hundred Rupees Ticket For Penguin In Rani Zoo राणी बागेतील पेंग्विन पाहणं सामन्यांच्या आवाक्याबाहेर?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/17231334/penguin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत आज (17 मार्च) राणी बागेतील पेंग्वीन कक्षाचं लोकार्पण केलं. पण पेंग्विन पाहणं सामन्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. कारण की, महापालिकेनं राणी बागेतल्या प्रवेश शुल्कात तब्बल 10 पट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी येणार आहे.
या प्रस्तावावर चर्चाही होणार आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाल्यास राणी बागेतल्या प्रवेश शुल्कात तब्ब्ल 10 पट वाढ होऊ शकते. सध्या राणी बागेचे 5 रु. आहे. पण यामध्ये वाढ झाल्यास प्रवेश शुल्क वाढवून 50रु. होऊ शकतं. तर पेंग्विन कक्षाचं प्रवेश शुल्क 100रु. असू शकतं.
दरम्यान, 31 मार्चपर्यंत मुंबईकरांना राणी बागेत विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर मात्र, पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क आकारलं जाईल. तूर्तास शुल्कवाढीचा प्रस्ताव आहे. जर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर पेग्विंन पाहण्यासाठी प्रौढांना 100 रुपये व लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क मोजावं लागू शकतं.
प्रत्येक दिवशी सुमारे सहा ते सात हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून एका वेळी 100 पर्यटकांचा गट तयार करून पेंग्विन कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती समजते आहे. एक एप्रिलपासून प्रौढांसाठी 100 रुपये व लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क लागू होऊ शकतं. पर्यटक बुधवार सोडता इतर दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहावाजेपर्यंत राणी बागेतील पेंग्विन पाहू शकतील.
संबंधित बातम्या:
मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेमागे पेंग्विन पाहता येतील: उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)