एक्स्प्लोर
'बाप्पा माझा' स्पर्धेतील महामोदक सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण

मुंबई : बाप्पा माझा महामोदक स्पर्धेतला महामोदक आज सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. त्यापूर्वी 10 फुटांचा हा महामोदक प्रदर्शनासाठी रविंद्र नाट्यमंदिरात ठेवण्यात आला होता. प्रदर्शनानंतर मोदकाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. हा महाकाय मोदाकाला आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मुंबईकरांची एकच झुंबड उडाली होती. या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी ढोल ताशांच्या तालावर रितेश देशमुखने ठेका धरला. सिद्धीविनायकाच्या संध्याकाळच्या आरतीनंतर हा महामोदक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला.
आणखी वाचा























