वरळीत सुविधांचा अभाव, 'युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरताहेत, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला
वरळी गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी चार महिन्याच्या बाळाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरत आहेत, अशी टीका आशीष शेलार यांनी केली आहे.
![वरळीत सुविधांचा अभाव, 'युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरताहेत, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला Ashish Shelar lashes out at Aditya Thackeray Lack of facilities in Worli Yuvraj is currently dealing with international issues वरळीत सुविधांचा अभाव, 'युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरताहेत, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/e3118551b9a91b5f7e962297b21ce8d1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वरळी (worli) येथे मंगळवारी झालेल्या गॅस सिलिंडरचा स्फोटात (Gas cylinder blast) एकाच कुटुंबातील चार जण जखमी (four people injured) झाले होते. त्यापैकी चार महिन्याच्या बाळाचा डॉक्टरांच्या हलगर्गीपणामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजपा नेते आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरत आहेत, अशी टीका आशीष शेलार यांनी केली आहे. टीका करताना त्यांनी म्हटलं की, ''सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे हे दुर्दैव आहे. नायर हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. घटनेला 72 तास होऊनही महापौर घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. मग वरळीचे आमदार कसे पोहोचतील? युवराज सध्या आंतरराष्ट्रीय विषयावर फिरत आहेत.''
आशीष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ''22 हजार 500 कोटी महापालिका खर्च करते. हा खर्च कशावर करण्यात येतो? पेंग्विनवर 15-16 कोटी खर्च करतात. पण बाळाला उपचार मिळत नाही? भाजपा जनतेचे सर्व प्रश्न विचारणार?'' असे सवाल उपस्थित करत शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
आशीष शेलार यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की, ''चार महिन्याच्या बाळावर 45 मिनिटे उपचार होत नाहीत, हा प्रश्न विचारला तर यात राजकारण कुठलं आलं. सरकार पेंग्विनसाठी चालणार असेल तर मग काय उपयोग. पेंग्विनची काळजी घ्यावी वाटते, तर मग लहान बाळाची काळजी घ्यावी वाटते का? स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे.''
वरळीतील बीडीडी चाळीत मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. जखमींमधील चार महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला. स्फोटातील जखमींवर उपचाराला नायर रुग्णालयात (Nair hospital) उशीर झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. जखमींपैकी तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) दाखल केलं होतं. त्यामधील चार महिन्याच्या लहान बाळाचा मृत्यू झाला. जखमींच्या उपचारामध्ये नायर रुग्णालयात हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्राच्या डाळिंबाला गुजरातमध्ये 'अच्छे दिन'!
- अवकाळीचा दणका! कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; भाज्यांचे भाव स्थिर
- कोट्यवधी खर्चून केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडताना पडला खड्डा, नारळ काही फुटला नाही!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)