एक्स्प्लोर

कोट्यवधी खर्चून केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडताना पडला खड्डा, नारळ काही फुटला नाही!

उत्तर प्रदेश : बिजनौरमध्ये रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार उघड झाला आहे. कोट्यवधी खर्चून केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडताना नारळ काही फुटला नाही, तर रस्त्यालाच खड्डा पडला

उत्तर प्रदेश : एखाद्या नव्या कामाच्या सुरुवातील नारळ फोडून शुभ शकून करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. अशाच एका उद्घाटनाची सध्या चर्चा सुरु आहे. त्याचं कारणही तितकंच विचित्र आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार उघड झाला आहे आणि हे पितळं उघडं पडण्याची घटना ज्याप्रकारे घडली त्याचीही जोरदार चर्चा होत आहे. बिजनौरमध्ये भाजपा आमदार सूची चौधरी रस्त्याचं उद्घाटन करत असताना नारळ वाढवण्याच्या वेळी नारळ फुटलाच नाही, त्याऐवजी रस्त्यात मात्र खड्डा पडला. या घटनेमुळे उद्घाटनप्रसंगीच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. यावर काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे.

सिंचन विभागाकडून बिजनौरमधील कालव्याजवळ रस्ता तयार करण्यात आला. 7 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 1 कोटी 16 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र केवळ 700 मीटर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावरच या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. एकूण 7 किलोमीटरचा रस्ता तयार करुन त्याला कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे.

रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची चौधरी या आपल्या पतीसह पोहोचल्या. विधीवत पूजा पार पडल्यानंतर आमदारांनी नारळ वाढवण्यास सुरुवात केली. सूची चौधरी यांनी नारळ फोडण्यासाठी रस्त्यावर आपटला. मात्र, नारळ फुटलाच नाही. त्या ऐवजी रस्त्यावर खड्डा पडला. त्यामुळे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. यावेळी नाराज आमदार आणि नागरिकांनी घटनेवर संताप व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणी चौकशीची मागणी केली. 

याप्रकरणावर उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे. काँग्रेसनं ट्विट केलं आहे की, ''एक रस्ता साध्या नारळाचा फटका सहन नाही करु शकला. यालाच म्हणतात विकास!'' ​

जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत समिती स्थापन केली आहे. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामात कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, असं आश्वासनही जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी दिलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Embed widget