Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्याला जागा द्या; उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray Shivsena Dharavi Morcha : धारावीच्या विकासाला विरोध नाही, पण प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.घराला घर दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
![Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्याला जागा द्या; उद्धव ठाकरेंची मागणी uddhav thackeray shivsena dharavi morcha speech criticism on eknath shinde bjp maharashtra mumbai politics Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्याला जागा द्या; उद्धव ठाकरेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/20/04a6d6aeae89f2de9bf4bc73014e1ece1676878168052566_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधात मोर्चा (Shivsena Dharavi Morcha) काढण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
यांना खोके कुणी पुरवले?
आता पन्नास खोके कमी पडायला लागलेत त्यामुळे आता धारावी विकायला निघालेत अशी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडलं, आता सर्वांना समजलं असेल की त्यांना खोके कुणी पुरवले असेल, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केलं असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत यांना काहीच करता आलं नाही. त्यामुळे सरकार पाडलं.
हे देवेंद्र फडणवीसांचे पाप
आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, पण धारावीचा गळा घोटू असा एकही निर्णय घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2018 साली धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे पाप देवेंद्र फडणवीसांचे आहे असा आरोपही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाचे संकट ज्यावेळी आलं होतं त्यावेळी धारावीच्या परिस्थितीवरून देशभर टेन्शन होतं. पण धारावी कोरोनाशी लढली, त्यावेळी आम्ही कुणालाही पात्र आणि अपात्र ठेवलं नाही. पण आता पुनर्विकासाच्या निमित्ताने अनेकांना अपात्र ठरवणार. त्यांना उचलून मिठागराच्या ठिकाणी ठेवणार.
या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची धमक नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिले, त्यावेळी 105 मराठी माणसांनी रक्त सांडलं. ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, त्याला हात लावाल तर याद राखा असा इशारा उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेविरोधा ठाकरे गटाने आज भव्य मोर्चा काढला. धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
Dada Bhuse : बडगुजर हा छोटा मासा, सलीम कुट्टाप्रकरणी चौकशीत अनेकजण सापडणार; दादा भुसे यांचा ठाकरे गटाला इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)