Mumbai Local Train Accident: अपघातात लोकल ट्रेनमधून पडून नेमके किती जण जखमी, किती जणांचा मृत्यू, महत्त्वाची अपडेट
Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वे म्हणते 8 प्रवासी पडले, कळवा रुग्णालयाकडून 10 जणांची लिस्ट, पण ट्रॅकच्या कडेला 7-8 बॉडी दिसल्या, जखमी-मृतांच्या आकड्याचा थांगपत्ताच नाही!

Mumbai Local Train Accident: मुंबई उपनगरी रेल्वे सेवेच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल ट्रेन्स आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून (Train Accident) खाली ट्रॅकवर पडले. ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे हे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना काहीवेळापूर्वी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Railway Accident)
Mumbai Local Train: जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे
1. श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
Railway Accident Mumbai: मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे
1. राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा,
2. सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर
3. मयूर शाह (50 )
4. मच्छींद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)
आणखी वाचा
























