Lalbaugcha Raja : 'ही शान कोणाची...' लालबागच्या राजाची पहिली झलक, राजाचं 90व्या वर्षात पदार्पण; पाहा व्हिडिओ
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची पहिली झलक आज भक्तांना पाहायला मिळाली.
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक पाहायला मिळाली. अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार करुन दाखवण्यात आला. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात. इतकच नव्हे अगदी राजकारण्यांपासून ते मोठमोठ्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण लालबागच्या चरणी लीन होतात. त्याच राजाची शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी पहिली झलक दाखवण्यात आली.
असा असेल यंदाचा राजाचा दरबार
यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होईल. त्यासाठी संपूर्ण लालबागकरांचा उत्साह हा शिगेला पोहचलाय. तीन दिवसांवर गणोशोत्सव येऊन ठेपलाय. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिवाय आकर्षक अशी फुलांची आरास देखील यावेळी करण्यात आलीये. लालबागच्या राजाच्या मंडपाची ही प्रतिकृती दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे.
नितीन देसाईंची शेवटची कलाकृती
लालबागच्या राजाचा मंडप ही नितीन देसाईंची यांची शेवटची कलाकृती ठरली. त्यामुळे यंदाचा राजाचा मंडप हा कार्यकर्त्यांसाठी आणि देसाईंच्या चाहत्यांसाठी विशेष आहे. शिवाय आकर्षक अशी फुलांची आरास देखील यावेळी करण्यात आलीये. लालबागचा राजा आणि भक्तांचं एक विशेष नातं आहे. तसंच काहीसं नितीन देसाई यांचं देखील होतं. त्यांना यावेळी मंडळाकडून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे.
लालबागचा राजा आणि भक्तांचं विशेष नातं आहे. नवासाला पावणारा गणपती म्हणून राजाची विशेष ख्याती आहे. त्यामुळे त्याच्या चरणी प्रत्येकजण लीन होतो. बुधवार (7 जून) रोजी लालबागच्या राजाचा मुहू्र्त पूजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर राजाचा मंडप सजवण्याची तयारी सुरु झाली. . गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी मुंबईत येतात. लालबागच्या राजाकडे मागितलेल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे दर गणेशोत्सवात लालबागला राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. तर यंदा देखील अशीच गर्दी लालबागच्या राजाच्या मंडपात पाहायला मिळणार यात शंका नाही.
हेही वाचा :