विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन करणं भोवलं, शिवसेना सचिव किरण पावसकरांसह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Vijay Wadettiwar : विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी हे सत्य न्यायालयापासून (Court) लपवून ठेवले. या देशद्रोह्याला भाजपने (BJP) उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता.
यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून (Shiv Sena) सोमवारी बाळासाहेब भवन येथे आंदोलन करण्यात आले होते. आता आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे सचिव किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदीचे आदेश असतानाही केले आंदोलन
शहरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असताना शिवसेनेकडून वड्डेटीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून वड्डेटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शिवसेना सचिव किरण पावसकर यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्पष्टीकरण दिले. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती. हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्या पुस्तकात तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
वडेट्टीवारांची उज्ज्वल निकमांवर टीका
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा उज्ज्वल निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झालीच असती. कारण कसाब हा दहशतवादी होता. त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं. आम्ही जे काय बोललो आहोत, त्याविषयी उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Hasan Mushrif on Ujjwal Nikam : ॲड. उज्वल निकम हे निर्भीड आणि प्रामाणिक कायदेतज्ज्ञ : हसन मुश्रीफ