एक्स्प्लोर

भाजपचं ठरलं! शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा, पूर्ण ताकदीने काम करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

Shivadi Assembly constituency : शिवडीत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

मुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

आमदार शेलार म्हणाले, "ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. मग दोघेच राहतात, महाविकास आघाडी आणि मनसे. मतदारांचा विचार करून उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे उभे आहेत. त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे."

ठाकरे गटावर तोफ डागताना आशिष शेलार म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली आणि एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना मदत केली असता, त्याची चेष्टा केली."

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समलैंगिक म्हणून अपमान करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी कधी खडे बोल सुनावले नाही. सावरकरांच्या बदनामीला मूक पाठिंबा दिला.  'पीएफआय'वर बंदी आणली, त्यावर समर्थ करणारी भूमिका मांडली नाही. पालघर साधू हत्याकांड झाले, पण ना खेद ना दु:ख, ना चौकशीला तयार. सीएए ला विरोध केला, काश्मीर मध्ये 370 हटवले त्याला विरोध. हिंदू समाज सडलेला आहे, असे शरजील उस्‍मानी म्‍हणतो यांना महाराष्‍ट्रात ठाकरे सरकार निर्दोष सोडते. मग आम्ही त्यांचे कसे समर्थन करणार, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

लालबागच्या राजाची परंपरा खंडित केल्याचा आरोप

ठाकरे गटाचा उमेदवार कोण, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही टीव्हीवर पाहिले की चौधरीना उमेदवारी दिली तेव्हा सुधीर साळवी यांचे समर्थक आक्रमक झाले. परंतु हे भोग आहेत. कोरोनाकाळात गणेशभक्त सांगत होते की गर्दी नको, ऑनलाइन दर्शन घेऊ. आम्हाला उत्सव साजरा करू द्या. पण सुधीर साळवी यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी केली. गणेशभक्तांना काय वाटेल, याचा विचार न करता उद्धव ठाकरेंच्या हुकुमाखातर लालबागच्या राजाची 100 वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळे सुधीर साळवी त्याचे परिणाम भोगत आहेत. अजय चौधरी23 नोव्हेंबरला निकालादिवशी भोगतील. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता पूर्ण ताकदीने कामाला लागून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड  मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, कंटेनरची मिनी बसला धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंतABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report : Raj Thackeray VS Ajit Pawar : राज ठाकरेंचा अटॅक, अजितदादांचा पलटवार; इंजिनाची धडक, घडाळ्याचे ठोके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, कंटेनरची मिनी बसला धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
कोस्टल रोडवर हाजीअलीच्या वळणावर भीषण अपघात, कार रेलिंगवर आपटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
IPO Update : पैसे तयार ठेवा, आठवड्यात  9 आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
गुंतवणूकदारांना कमाईची संधी, शेअर बाजारात 9 आयपीओ येणार, जाणून घ्या सविस्तर 
Embed widget