IPO Update : पैसे तयार ठेवा, आठवड्यात 9 आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
IPO Update : भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात 9 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी या निमित्तानं मिळाली आहे.

मुंबई: भारतीय शेअर बाजारात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर चढ उतार पाहायला मिळत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प, जागतिक आर्थिक स्थिती, रुपयाचं घसरलेलं मूल्य,डॉलरची मजबुती या गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतो. भारतीय शेअर बाजारात 10 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात 9 आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुले होणार आहेत. याशिवाय 6 आयपींचं लिस्टिंग होणार आहे.
अजाक्स इंजिनिअरिंग
अजाक्स इंजिनिअरिंगचा आयपीओ आजपासून बोली लावण्यास खुला होत आहे. तर,12 फेब्रुवारीला आयपीओ बोली लावण्यासाठी बंद होईल. या आयपीओचा किंमतपट्टा 599-629 रुपये इतका आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1269 कोटी रुपयांची उभरणार आहे. यातील 2.01 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. यामध्ये केदारा कॅपिटल फंड टू एलएलपीचा समावेश आहे.
हेक्सावेअर टेक्नोलॉजीज
हेक्सावेअर टेक्नोलॉजीज या कंपनीचा आयपीओ 122 फेब्रुवारीला गुंतवणुकीसाठी खुला होईल. तर, 14 फेब्रुवारीला आयपीओ बोली लावण्यास बंद होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 8750 कोटी रुपयांची उभारणी करेल. आयपीओचा किंमतपट्टा 674-708 रुपये असेल. सीए मॅगनम होल्डिंग्जकडून ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाईल.
क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आयपीओ
हा आयपीओ देखील मेनबोर्ड आयपीओ असेल. ही कंपनी इलेक्ट्रिकल क्षेत्रातील वस्तूंची निर्मिती करते. आयपीओ 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बोली लावण्यास खुला असेल. कंपनी 225 कोटी रुपयांची उभारणी आयपीओच्या माध्यमातून करणार आहे. हा आयपीओ देखील पूर्णपणे ऑफर फॉर फॉर सेल आहे. 1.49 कोटी शेअरची विक्री केली जाईल.
चंदन हेल्थकेअर आयपीओ
पॅथालॉजी आणि रेडिओलॉजी टेस्टिंग क्षेत्रातील कंपनी चंदन हेल्थकेअर चा आयपीओ एसएमई सेगमेंटमधील आहे. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या दरम्यान आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असेल. एका शेअरची किंमत 151-159 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. आयपीओच्या माध्यमातून 107.4 कोटी रुपयांची उभारणी केली जाईल. हा आयपीओ काही नवे शेअर जारी करेल तर काही शेअरची विक्री करले. 70.79 कोटी रुपयांचे 44.52 लाख शेअर जारी केले जातील. तर, 36.57 कोटी रुपयांचे 22.99 लाख शेअर ऑफर फॉर सेल द्वारे विकले जातील.
पीएस राज स्टील्स आयपीओ
हिस्सारमधील पीएस राज स्टील आयपीओतून स्टील पाईप आणि ट्यूब्सचं उत्पादन केलं जातं. ही कंपनी आयपीओद्वारे 28 कोटी रुपयांची उभारणी करेल. 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान बोली लावली जाईल. तर, किंमतपट्टा 132-140 रुपये असेल.
वोलेर कार आयपीओ
वोलेर कार आयपीओद्वारे 27 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. हा आयपीओ देखील एसएमई क्षेत्रातील आहे. फेब्रुवारी 12 ते 14 दरम्यान आयपीओवर बोली लावली जाईल. किंमतपट्टा 85-90 रुपये असेल.
मॅक्सवोल्ट एनर्जी इंडस्ट्रीज
मॅक्सवोल्ट एनर्जी इंडस्ट्रीज 54 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणणार आहे. आयपीओ 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
एल के मेहता पॉलीमर्स
ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 7.38 कोटी रुपयांची उभारणी करेल. 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयपीओ बोली लावण्यास खुला असेल. आयपीओचा किंमतपट्टा 71 रुपये शेअर आहे.
शनमुगा हॉस्पिटल
तामिळनाडूतील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आयपीओच्या माध्यमातून 20.62 कोटी रुपयांची उभारणी करेल. एका शेअरची किंमत 54 निश्चित केली जाईल. 13 ते 17 फेब्रुवारी रोजी आयपीओ बोली लावण्यास खुला असेल.
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात खुले झालेले एसएमई आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होतील. चामुंडा इलेक्ट्रिकल्स, केन एंटरप्रायझेस, सोलारियम ग्रीन एनर्जी, रेडिमिक्स कन्स्ट्रक्शन मिशनरी,हे आयपीओ लिस्ट होतील.
इतर बातम्या :
तुम्हालाही Income Taxकडून TDS अलर्टचा मेसेज आलाय काय? कारवाई होणार का? जाणून घ्या काय आहे प्रकरण
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
