एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवडी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत; भाजपचा 'मोहरा' शिंदे गटातून लढणार?, तिरंगी लढत होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिवडी मतदारसंघ (Shivadi Assembly Constituency) सध्या चर्चेत आहे. शिवडीतून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा विद्यामान आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना मैदानात उतरवलं आहे. तर मनसेकडून बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) रिंगणात आहेत. अद्याप महायुतीकडून शिवडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा झालेली नाही. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोड्याच वेळात शिवडी विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक नाना अंबोले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. नाना अंबोले परळमधून दोन टर्म शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. तसेच नाना अंबोले हे भाजपचे मुंबई उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. नाना अंबोलेंच्या उमेदवारीमुळे शिवडीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

शिवडीतून ठाकरेंकडून पुन्हा अजय चौधरी यांना उमेदवारी-

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात लालबागचा राजा मंडळाची सचिव सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे. 

288 मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र-

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत 3 हजार 259 उमेदवारांचे 4 हजार 42 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली असून 22 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून मंगळवार, 29 ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता; Video:

संबंधित बातमी:

Shivadi Assembly constituency : मोठी बातमी : सुधीर साळवी यांना उमेदवारी नाहीच, शिवडीतून पुन्हा अजय चौधरीच मैदानात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget