Amit Shah Mumbai Visit LIVE : राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर
Amit Shah Mumbai Visit LIVE Updates : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर, भाजप नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, लालबागचा राजा आणि प्रमुख नेत्यांच्या घरी गणपतीचं दर्शन

Background
Amit Shah Mumbai Visit LIVE Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहेत. काल (रविवारी) संध्याकाळी ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja 2022) दर्शन घेतील. आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जातील.-तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक मंडळालाही ते भेट देणार आहेत. याशिवाय अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अमित शाह काल (रविवारी) मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे दहा वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहतील.
मुंबई दौऱ्यावेळी अमित शाह अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी आधीपासूनच जोर धरला आहे. त्यामुळे अमित शाह राज ठाकरेंची भेट घेणार का? याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सोमवारी 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
कधी आणि कुठे होणार वाहतूकीवर परिणाम?
रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे.
सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे.
कसा असेल अमित शाह यांचा मुंबई दौरा?
सकाळी 9 वाजता : अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.
सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील.
सकाळी 10.30 वाजता : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील.
सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.
सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील
दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.
दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.
दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.
दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.
संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण
मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, शाहांचा ताफा वांद्र्याच्या दिशेनं रवाना
LIVE UPDATES : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, शाहांचा ताफा वांद्र्याच्या दिशेनं रवाना, आशिष शेलारांच्या मतदारसंघात घेणार बाप्पाचं दर्शन #AmitShah https://t.co/oyOkBaxYX8 pic.twitter.com/TkHKOhQfWX
— ABP माझा (@abpmajhatv) September 5, 2022























