एक्स्प्लोर

Amit Shah Mumbai Tour: मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा; अमित शाह यांनी दंड थोपटले

Amit Shah Mumbai Tour: मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Amit Shah Mumbai Tour : राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. 

अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे शाह यांनी सांगितले.

BMC ची ही शेवटची निवडणूक आहे आणि लढा: देवेंद्र फडणवीस

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा आवेशपूर्ण  शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. आपले 'मिशन मुंबई' साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले.

पाहा व्हिडिओ: Amit Shah यांची भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद, Uddhav Thackeray यांच्यावर साधला निशाण्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Shivtare On Baramati Loksabha : संपूर्ण ताकदीने सुनेत्रा वहिनीचे काम करतोयM K Madhvi Arrested : राजन विचारेंचे निष्ठावंत कार्यकर्ता एम.के.मढवी  पोलिसांकडून अटक !Ajit Pawar On Dharan : धरणाच्या वाक्यामुळे माझं वाटोळं झालं,पहिल्यांदाच संपूर्ण किस्सा सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Embed widget