उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव; कोरोना काळातील कामगिरीबद्दल `सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार'
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे (यूरोप) अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात 70 देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे.
पुणे : आपल्या कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स कड़ून दखल घेण्यात आलीय. कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा `सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित पवारांना देण्यात आला.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे (यूरोप) अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात 70 देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संस्थेच्या वतीने व्यक्ती व संस्थांना सन्मानित केले जाते.
सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार कुणाला दिला जातो?
कोरोना काळातील कामगिरीबद्दल `सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार' दिला जातो. सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार हा कोरोना काळात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी दिला जातो. जगातील 70 देशामध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था काम करते. सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार हा कोविड योद्धा म्हणून दिला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचवली आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ही संस्था काय काम करते?
वर्ल्ड बुक रेकॉर्ड ही संस्था जगभरातील विश्वविक्रमाची नोंद करण्याचे काम करते. लोकांच्यातील टॅलेंटची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करू देण्याचे काम ही संस्था करते. जेणेकरून त्या क्षेत्रातील लोकांना एक भविष्यात प्लॅटफॉर्म मिळू शकेल. हा मुख्य या संस्थेचा उद्देश आहे. एखाद्या क्षेत्रात जर कुणी नवीन रेकॉर्ड केला असेल तर किंवा कुणाचं रेकॉर्ड मोडलं असेल तर ही संस्था त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेला पुरस्कार प्रदान करते.
अजित पवारांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार का दिला गेला?
कोरोना काळ सुरु झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने मंत्रालय स्तरावर निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य, कोरोनामुक्तीसह रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतात. त्यातून विविध विषयांवर चर्चा करतानाच आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्णयही ते घेत असतात. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अजित पवारांनी जे सक्षम आणि झटपट निर्णय घेतले त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यास मदत झाली. त्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार अजित पवारांना दिल्याची माहिती लंडन बुक ऑफ रेकॉर्ड चे भारतातील राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी दिली.