एक्स्प्लोर
11 तासाने विमानाचं उड्डाण, संतप्त प्रवाशांची एअर इंडियाविरोधात नाराजी
एअर इंडियाचं एआय 983 हे विमान काल रात्री दुबईकडे उड्डाण घेणार होतं. मात्र प्रवासी जेव्हा विमानात बसले तेव्हा विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं.
मुंबई : तब्बल 11 तास खोळंबलेलं विमान अखेर आज (3 ऑगस्ट) सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईकडे रवाना झालं. मात्र या खोळंब्यामुळे जवळपास 150 प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले होते.
एअर इंडियाचं एआय 983 हे विमान काल रात्री दुबईकडे उड्डाण घेणार होतं. मात्र प्रवासी जेव्हा विमानात बसले तेव्हा विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द केलं गेलं.
उड्ड्याण रद्द केल्यानंतर सर्व प्रवाशांना वेटिंग रूम मध्ये बसवण्यात आलं. यावेळी एअरपोर्ट प्रशासनाकडून प्रवाशांना योग्य त्या सुचना दिल्या गेल्याच नाहीत. उलट एजंटकडून विमानाच्या तिकीटाचे पैसे परत घ्या, अशी संतापजनक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
घडलेल्या सर्व प्रकारानंतर संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात नाराजी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement