केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांचीही खाती ट्विटरकडून निलंबित
काँग्रेस पक्ष आणि केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर खाते निलंबित करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या नेत्यांचेही ट्वीटर हँडल ट्वीटरकडून निलंबित करण्यात आले आहे. याअगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. यामुळे ट्विटरला नेमकं काय झालंय? काँग्रेसवरतीच कारवाई का होत आहे? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
मंत्री थोरातांचे ट्विटर अकाऊंट निलंबित का?
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत ‘मैं भी राहुल’ असे ट्विट केले होते. थोरातांच्या पाठिंब्यामुळे त्यांचेही ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. केंद्र सरकार नागरिकांचे विचार दाबण्याचे काम करत आहे. भाजपच्या दबावाखाली ट्विटर काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू, हम लढेंगे, असा आक्रमक पवित्रा थोरात यांनी घेतला आहे.
Twitter Account : काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद
लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच मत मांडण्याचा अधिकार आहे. यामुळे ट्विटरच्या माध्यमातून मत मांडण्याचा प्रयत्न करतो. पण, ट्विटरने काँग्रेस नेत्यांच्या ट्विटरवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. भाजपाच्या दबावाखाली काम करणे चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चाललेली असलयाचे सगळ्यांना दिसत आहे.” अशी संतप्त प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
भाई जगताप यांचेही ट्विटर अकाऊंट निलंबित
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचेही ट्विटर खाते निलंबित करण्यात आले आहे. भाई जगताप यांनीही राहुल गांधी यांना आपला पाठींबा दर्शवला होता.
कारवाई का?
ट्विटर इंडियाने आता एबीपी न्यूजला सांगितले की, काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांच्या ट्विटर हँडलने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, "ट्विटरने त्याचे सर्व नियम विवेकी आणि निष्पक्ष पद्धतीने लागू केले आहेत. आमच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिमा पोस्ट करणाऱ्या शंभरेक ट्विटर खात्यांवर आम्ही कारवाई केली आहे. आमचं ध्येय नेहमीच लोकांची गोपनीयता आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
