एक्स्प्लोर
नाराज युवासैनिक भाजपच्या वाटेवर, आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत फूट?
मुंबई : ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसण्याची चिन्हं आहेत. आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेतील नाराज सैनिक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
युवासेना अध्यक्षांबाबत तसंच त्यांच्या कार्यशैलीबाबत फेसबुकवर नाराजी व्यक्त करणाऱ्या अमर पावले, या युवा ब्रिगेडच्या कार्यकारिणी सदस्याची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर युवासेनेत असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची युवासेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
आदित्य यांच्याभोवती जमा झालेला परप्रांतिय मित्रांचा गोतावळा, उच्चभ्रूंवर लक्ष देताना सर्वसामान्य शिवसैनिकांकडे दुर्लक्ष तसंच मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना शिवसेनाप्रणीत संघटनांची जबाबदारी दिल्यामुळे युवासेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
याशिवाय काही कार्यकर्त्यांना व्हॉटस्अॅप ग्रुपमधूनही काढल्याने युवासेनेमध्ये फूट पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. परिणामी अमर पावले युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
अमर पावले यांची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement