एक्स्प्लोर

ABP Majha Impact | एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशननंतर काही तासातच ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा

एबीपी माझाने स्टिंग ऑपरेशन करुन मुंबईतील बार, क्लबमध्ये अजूनही कशाप्रकारे नियमांचं उल्लंघन होत आहे हे समोर आणलं. त्यानंतर काही तासातच मुंबई पोलिसांनी ड्रॅगल फ्लाय क्लबवर छापा टाकला. यावेळी सुरेश रैना, गुरु रंधावा, सुझान खान उपस्थित होते.

मुंबई : मुंबईमध्ये क्लब आणि पबमध्ये सुरु असलेल्या पार्ट्यांचं वास्तव एबीपी माझाने दाखवलं होतं. याची तात्काळ दखल घेत मुंबईच्या अंधेरी परिसरात असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकत 34 लोकांवर गुन्हा दाखल केला. तर मुंबई महानगरपालिकेकडून ज्यांनी मास्क घातला नव्हता त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला. यामध्ये सुरेश रैना, गायक गुरु रंधावा आणि सुझान खान अशा बड्या नावांचा समावेश होता. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत, मात्र ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवून मंगळवारी पहाटेपर्यंत पार्टी केली जात होती. त्यामुळे हे सेलिब्रिटी नेमका कुठला आदर्श समाजापुढे ठेवत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.

या छाप्यात एकूण 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा यांचा समावेश आहे. दोघांनाही टेबल जामीन मिळाला असून सुझान खानला 41 A अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आलं.

सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले?

  • पहाटे जो छापा पडला त्यात 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा, 33w मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
  • आपण कर्फ्यू लागू केलेला असतानाही उशिरापर्यंत क्लब सुरु होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब वर कारवाईची ही पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा मुंबई महापालिकेकडून दोन वेळा अशा क्लबवर कारवाई करण्यात आली. मात्र तरीसुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे. अशा पार्ट्यांमध्ये बहुतांश वेळी चांगल्या घरातील आणि सुशिक्षित लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो आणि अशा सुशिक्षित लोकांकडून कायद्याचे उल्लंघन होणं हे आश्चर्यकारक आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीची सुद्धा दखल घेतल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.

एबीपी माझाचा इम्पॅक्ट

एबीपी माझाने स्टिंग ऑपरेशन करुन मुंबईतील बार, क्लबमध्ये अजूनही कशाप्रकारे नियमांचं उल्लंघन होत आहे हे समोर आणले होते.

  • एबीपी माझाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर स्थानिक वॉर्ड ऑफिसरला सूचना देण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितलं.
  • वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब, क्लब आणि हॉटेलवर कडक कारवाई करण्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश..

ड्रॅगन फ्लाय क्लबवरील कारवाईबाबत महापालिकेचं स्पष्टीकरण गेल्या काही दिवसांपासून सर्वच क्लब, पब, हॉटेलवर प्रशासनाची नजर आहे. ड्रॅगन फ्लाय क्लबवर झालेली कारवाई ही अशाच प्रकारची आहे. यात जे व्यक्ती नियमांचं उल्लंघन करताना आढळले त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान लंडनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार सापडला आहे. याचा प्रसार 70 टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने होतो. परिणामी गाफिल राहून चालणार नाही. त्यामुळे वेळेत सावध होणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या

"पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!" पार्टी करणाऱ्यांना ट्वीट करत मुंबई पोलिसांचा सूचक इशारा

Mumbai Night Club Raid | ....म्हणून मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर कारवाई : विश्वास नांगरे पाटील

Mumbai Night Club Raid | सुरेश रैना, सुझान खानची उपस्थिती असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर धाड

Night Club Raid | मुंबईच्या अंधेरीतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा, अनेक सेलिब्रिटींवर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget