(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!" पार्टी करणाऱ्यांना ट्वीट करत मुंबई पोलिसांचा सूचक इशारा
मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसून रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला नियम डावलून पार्टी करणाऱ्यांना मुंबई पोलीसांनी ट्वीट करत सूचक इशारा दिला आहे.
मुंबई : ट्विटरवर जर सगळ्यात सक्रिय पोलीस असतील तर ते मुंबई पोलीस आहेत. ते नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चर्चा होत असते. आताही मुंबई पोलीसांनी ट्वीट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल होत असतात.
मुख्यमंत्री कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काल रात्री मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसून रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला नियम डावलून पार्टी करणाऱ्यांना मुंबई पोलीसांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये मुंबई पोलीस म्हणाले, "पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!"
'पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!'
अंधेरी येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लबवर धाड टाकण्यात आली, तसेच तेथे उपस्थित असलेल्या ३४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यापैकी १९ व्यक्ती दिल्ली व पंजाब येथून आले असून यात काही नामांकित व्यक्तींचाही समावेश आहे.#NewNormal — Mumbai Police (@MumbaiPolice) December 22, 2020
31 डिसेंबरला पनवेलमधील फार्महाऊसवर पडणार छापे
31 डिसेंबर रोजी नविन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईच्या बाहेर जाण्याचे नियोजन दरवर्षी केले जातात. मुंबई , नवी मुंबईतील अनेकजण हाकेच्या आंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील फार्महाऊसला पसंती देतात. पनवेल तालुक्यात 400 ते 500 फार्महाऊस असल्याने पोलीसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मुंबईत नविन वर्षाच्या स्वगातावर काहीशे निर्बंध येणार असल्याने अनेकजण शहराबाहेरचा रस्ता धरतील. यामुळे ग्रामीण भागात असलेल्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलीसांकडून सर्च ॲाफरेशन हाती घेण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम डावलून फार्महाऊसवर गर्दी करीत पार्टी करणाऱ्यांवरर गुन्हे दाखल करण्याची तयारी पनवेल पोलीसांनी केली आहे. यासाठी 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन तीन दिवस आधीपासून फार्महाऊसवर नजर ठेवण्यात येणार आहे. गरज पडल्यास छापामारी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले आहे.
ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.