एक्स्प्लोर
Advertisement
मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत 'ब्लॉग माझा २०१९' स्पर्धा!
लिखित माध्यमांच्या पारंपरिक मर्यादा ओलांडून आंतरजालानं ब्लॉग हे माध्यम सर्वांना उपलब्ध करून दिले. याचाच उपयोग करून गेल्या काही वर्षात उत्तमोत्तम मराठी ब्लॉग पुढे आले. या ब्लॉगच्या लेखकांच्या म्हणजेच ब्लॉगर्सच्या कौतुकाचा मंच म्हणजे 'एबीपी माझा'ची 'ब्लॉग माझा' स्पर्धा! यंदा 'ब्लॉग माझा २०१९' स्पर्धा सुरू होत आहे, जुन्यासह नव्या ब्लॉग्ज आणि नव्या विषयांच्या अपेक्षेसह...
मुंबई: 'ब्लॉग माझा २०१९' सुरू होत आहे. मराठी इंटरनेटविश्वातली ही तशी पहिली आणि एकमेव ब्लॉग स्पर्धा. गेली अनेक वर्ष ही स्पर्धा मराठी ब्लॉगर्सची हक्काची जागा बनली आहे. यात जसे जुने-जाणते लेखक भाग घेतात, तसंच नवोदितही यानिमित्त ब्लॉग लेखनाची सुरूवात करतात. मराठीत बहुतांश ब्लॉग हे व्यक्तिगत अनुभव, कथा, कविता, विचार मांडण्यासाठी जसे दिसून येतात, तसेच कला, क्रीडा, संस्कृती, राजकारण, कौशल्य, इतिहास, विज्ञान यातील एकाद्या विषयाला वाहिलेलेही असतात. 'ब्लॉग माझा' स्पर्धेमुळे या ब्लॉगर्सना अधिक व्यापक मंच तर मिळणार आहेच, शिवाय त्यांना वेगळी ओळखही मिळणार आहे.
सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकचा जमाना आहे. पटापट मिळणारे लाईक्स, पोस्ट शेअर करता येणं, वाचक-प्रेक्षकांचा मिळणारा इन्स्टंट प्रतिसाद यामुळे या माध्यमांना लोकप्रियताही मिळत आहे. मात्र, ब्लॉगचं एखाद्या पुस्तक किंवा डायरीसारखं स्वरूप हे ब्लॉगला एक खाजगी अनुभव बनवतं. जणू ते तुम्ही लिहिलेलं पुस्तकंच असतं! 'ब्लॉग माझा' स्पर्धा म्हणजे हे माध्यम अधिकाधिक लोकांनी वापरावं, व्यक्त व्हावं आणि मुख्य म्हणजे लिहितं व्हावं यासाठीचा प्रयत्न आहे. मान्यवर परिक्षकांकडून आम्ही हे ब्लॉग्ज तपासून घेतो हे विशेष. आजपर्यंत 'ब्लॉग माझा' स्पर्धेतून पुढे आलेल्या अनेक ब्लॉगर्सनी आज समाजमाध्यमांमध्ये नाव कमावलं आहे. 'ब्लॉग माझा २०१९' तीच संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
'ब्लॉग माझा २०१९' स्पर्धेचं स्वरूप, नियम, ब्लॉग पाठवण्याची मुदत आणि बक्षीसं यांचा तपशील या लिंकमध्ये तुम्हाला मिळेल. स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेला प्रतिसाद पाहून ब्लॉग पाठवण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पर्धक आता आपले ब्लॉग 5 डिसेंबरपर्यंत पाठवू शकणार आहेत.
ब्लॉग माझा : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement