एक्स्प्लोर

डोंबिवलीत 55 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

ठाणे : व्यापारात जमविलेल्या 1000-500 च्या जुन्या नोटा वटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पश्चिम मुंबईतील दोघा जवाहिऱ्यांचा मनसुबा गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने उधळून लावला. शनिवारी रात्री सापळा रचून केलेल्या कारवाईत या दुकलीकडून 55 लाख 5 हजारांच्या जुन्या चलनी नोटा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरूमितसिंग बारज आणि जयमीन गोरा अशी ताब्यात घेतलेल्या दोघा जवाहिऱ्यांची नावे आहेत. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी पश्चिम मुंबईतून हे दोघे व्यापारी डोंबिवलीत येणार असल्याची खबर क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय खेडकर यांच्यासह राजेंद्रकुमार खिलारे, दत्ताराम भोसले, हरिश्चंद्र बंगारा, अजित राजपूत आणि नरेश जोगमार्गे या पथकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ सापळा लावला. यावेळी या दोघांना बॅगांनी भरलेल्या नोटांसह रंगेहात ताब्यात घेतले. यातील गुरूमितसिंग बारज याच्याकडून 36 लाख, तर जयमीन गोरा याच्याकडून 19 लाख 50 हजारांच्या जुन्या चलनातील नोटा हस्तगत करण्यात आल्या. या दोघांच्या विरोधात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करून चौकशीसाठी क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले आहे. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, हे दोघेही सोने-जवाहिऱ्याचे व्यापारी आहेत. व्यापारात त्यांनी या नोटा जमविल्या होत्या. मात्र या नोटा चलनातून हद्दपार झाल्यामुळे त्यांना कुणीतरी 50 टक्के कापून नव्या नोटा देण्याचे अमिष दाखविले होते. या सर्व नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याची माहिती दिल्यानंतर आयकर विभाग पुढील चौकशी करणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाची फडणवीस सरकारकडून गंभीर दखल, धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार
मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाची फडणवीस सरकारकडून गंभीर दखल, धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?
पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget